Saroj Khan (Photo Credit: Instagram)

बॉलिवूडमधील उत्कृष्ट कोरिओग्राफर सरोज खान (Saroj Khan) यांची अचानक प्रकृती ढासळल्याची माहिती समोर आली आहे. सरोज खान यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना मुंबई (Mumbai) येथील वांद्रे (Bandra) परिसरातील गुरुनानक रुग्णालयात (Guru Nanak Hospital) दाखल करण्यात आले आहे. ज्यामुळे बॉलिवूडमधील सर्वच कलाकार धास्तावून गेले आहेत. सरोज खान 71 वर्षाच्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. मात्र, कोरोनाच्या अहवालात त्यांना कोरोना नसल्याचे निष्पन्न झाले आहे. याआधीही सरोज खान यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या सरोज खान यांची प्रकृती स्थिर असून त्यांना उद्या डिस्चार्ज मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरोज खान यांना आपल्या कारकिर्दीत अनेक कलाकारांना नृत्याचे प्रशिक्षण दिले आहे. त्यानी अनेक हिंदी चित्रपटासाठी कोरिओग्राफी केली आहे. कंगना रनौतचा गेल्या वर्षी आलेला चित्रपट मणिकर्णिका आणि द क्वीन ऑफ झांसी कोरिओग्राफी केली होती. याशिवाय करण जोहरचा कलंक या चित्रपटासाठी माधुरी दीक्षितला नृत्याचे प्रशिक्षण दिले होते. हे देखील वाचा- बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ने 'आग लगे बस्ती में...' असे म्हणत ट्विटरला केले अलविदा

मिस्टर इंडिया, चांदणी, बेटा, तेजाब, नगीना, डर, बाजीगर, अंजाम, मोहरा, याराना, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, परदेश, देवदास, लगान, सोल्जर, ताल, फिजा, साथ‌िया, स्वदेश, कुछ ना कहो, वीर जारा, डॉन, फना, गुरु, नमस्ते लंदन, जब वी मेट, एजेंट विनोद, राउडी राठोड़, एबीसीडी, तनू वेड्स मनु रिटर्न्स, मणिकर्णिका यासारख्या अनेक चित्रपटातील गाण्यातील कलाकारांना नृत्याचे प्रशिक्षण दिले आहे.