![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/06/35-380x214.jpg)
अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड जगतात चांगलीच खळबळ उडाली आहे. याचा परिणाम अनेक बॉलिवूडकरांच्या सोशल मिडिया अकाऊंटवर झालाय. यात काहींचे फॉलोअर्स कमी झाले आहेत तर काहींचे फॉलोअर्स वाढले आहेत. सुशांतच्या निधनामुळे अनेकांना ट्रोलला देखील सामोरे जावे लागलं आहे. असंच काहीसं अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या (Sonakshi Sinha) बाबतीत घडलं. म्हणूनच की काय सोनाक्षी सिन्हा आपले ट्विटर अकाउंट बंद केले आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने याबाबत माहिती दिली आहे. सोनाक्षी ने 'आग लगे बस्ती में, मैं अपनी मस्ती में'
सोनाक्षी सिन्हा ने याबाबत आपल्या इन्स्टा अकाउंटवर माहिती दिली आहे. "नकारात्मकतेपासून दूर राहण्यासाठी पहिलं पाऊल मी उचलते आहे. माझं पावित्र्य मी राखणार आहे. त्यामुळे ट्विटरवरुन निरोप घेते आहे. चला तर मग मी माझं ट्विटर अकाऊंट डीअॅक्टीव्हेट करते आहे. बाय.. पिस आऊट!" असे तिने यात म्हटलं आहे. COVID19 मुळे घरात अडकलेली अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिची चित्रकारिता पाहून व्हाल थक्क, पहा व्हिडिओ
पाहा सोनाक्षी सिन्हाची पोस्ट
अभिनेत्री सोनाक्षी सिन्ही सोशल मिडियावर बरीच सक्रिय असते. मात्र तिने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली. ज्यानंतर सोनाक्षी सिन्हाने एक ट्विट केलं. त्यावरुन तिला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं. या ट्रोलिंगनंतर सोनाक्षीने तिचं ट्विटर अकाऊंट डीअॅक्टीव्हेट केलं. याबद्दलची माहिती तिने इंस्टाग्रामवर दिली.