बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला लॉकडाऊनमध्ये घेतीय क्रिकेटचा आनंद; पहा व्हायरल व्हिडिओ
Urvashi Rautela (PC - Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. सध्या ती क्रिकेटचा आनंद घेत आहे. उर्वशीचा क्रिकेट खेळताना एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. उर्वशीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये उर्वशी उजव्या आणि डाव्या दोन्ही बाजूने आक्रमक फलंदाजी करत आहे. उर्वशीचा क्रिकेट खेळतानाचा अदांज पाहून तिचे चाहतेदेखील चकित झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर उर्वशीचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. (हेही वाचा - मुंबई पोलिसांकडून सुशांतचं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे; वकील विकास सिंह यांचा गंभीर आरोप)

 

View this post on Instagram

 

🏏⚾#queen @urvashirautela Playing #cricket 💞💞💞 #urvashirautela #urvashirautelahot #urvashians

A post shared by Rudra❤️UrvashiRautela (@urvashirautela4ever_) on

दरम्यान, उर्वशी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून नेहमी आपले बोल्ड फोटो शेअर करत असते. त्यामुळे ती नेहमी चर्चेत असते. यापूर्वी उर्वशी गौतम गुलाटीसोबच्या फोटोमुळे चर्चेत आली होती. या फोटोत उर्वशी आणि गौतम सप्तपदीचे फेरे घेताना दिसले होते. परंतु, हा एका फोटो शुटिंगदरम्यानचा होता.