अभिनेत्री तापसी पन्नू हिच्या आजीचे निधन; लॉकडाऊन मुळे झाले नाही अंत्यदर्शन, पहा Instagram Post
Tapsee Pannu (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Tapsee Pannu) हिच्या आजीचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. यांनतर तापसी ने सोशल मीडियावर आपल्या आजीचा फोटो शेअर करून त्यांच्या जाण्याचे दुःख व्यक्त केले आहे तसेच श्रद्धांजली वाहिली आहे. सध्या सुरु असणाऱ्या लॉक डाऊन मुळे आजीचे निधन होऊनही त्यांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी जाणे शक्य नसल्याचे सुद्धा सुख तापसीने व्यक्त केले आहे. तापसीची पोस्ट पाहून अनेक बॉलिवूड कलाकारांनी सुद्धा तिचे सांत्वन केले आहे. अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan), टिस्का चोपडा (Tisca Chopra) सहित तापसीच्या अन्य फॅन्सनी सुद्धा तिच्या आजीच्या निधनाचे दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली आहे. Rishi Kapoor One Month Death Anniversary: नीतू सिंह यांनी आपले दिवंगत पती ऋषि कपूर यांच्यासोबतचा एक जुना फोटो शेअर करुन लिहिली भावूक पोस्ट

तापसीने इंस्टाग्राम वर पोस्ट करत त्याखाली कॅप्शन लिहीत म्हंटले आहे की "आमच्या कुटुंबातील एका पिढीतील शेवटची सदस्य सुद्धा आज सोडून गेली आहे. यामुळे कुटुंबात निर्माण झालेली पोकळी भरून काढता येणार आहे, बीजी आम्ही तुला मिस करू"

पहा तापसी पन्नू इंस्टाग्राम पोस्ट

 

View this post on Instagram

 

The last of that generation in the family leaves us with a void that will stay forever.... Biji ❤️

A post shared by Taapsee Pannu (@taapsee) on

दरम्यान तापसी सध्या लॉक डाऊन काळात मुंबई मध्ये आपल्या परिवारासोबत राहात आहे. परिणामी तिला आजीचे अंतिम दर्शन घेण्यासाठी सुद्धा जाता आले नाही.