Rishi Kapoor One Month Death Anniversary: नीतू सिंह यांनी आपले दिवंगत पती ऋषि कपूर यांच्यासोबतचा एक जुना फोटो शेअर करुन लिहिली भावूक पोस्ट
Rishi Kapoor And Neetu Singh (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडचे (Bollywood) 80 च्या दशकातील चॉकलेट हिरो आणि सदाबहार असे अभिनेते ऋषि कपूर (Rishi Kapoor)  यांचे 30 एप्रिलला निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण देश हळहळला. संपूर्ण बॉलिवूडवर देखील शोककळा पसरली. त्यांच्या निधनाला आज 1 महिना पूर्ण झाला. त्यांच्या आठवणीत बुडलेल्या त्यांच्या पत्नी नीतू सिंह (Neetu Singh) यांनी आज त्यांच्यासोबतचा एक जुना फोटो शेअर करुन एक भावूक पोस्ट लिहिली. डोळ्यांच्या कडा टचकन ओल्या करतील अशी ही पोस्ट आहे. इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर करुन नीतू सिंह यांनी आपल्या मनातील भावना आपल्या चाहत्यांसमोर व्यक्त केल्या.

नीतू सिंह यांनी हा जुना फोटो शेअर करुन त्याखाली खूप छान संदेश लिहिला आहे. या फोटोमध्ये दोघे खूपच सुंदर दिसत आहेत. Rishi Kapoor Funeral: अभिनेते ऋषी कपूर पंचतत्वात विलीन; सैफ अली खान, करीना कपूरसह अनेकांनी उपस्थित राहून रणबीर कपूर, नीतू सिंह यांना दिला मानसिक आधार

या फोटोखाली त्यांनी म्हटले आहे की, "डोळ्यातून अश्रू न आणता मला आनंदाने सर्वांनी निरोप द्या. मला आनंदपूर्वक शुभेच्छा द्या जेणेकरुन मी हे सर्व माझ्या हृदयात सामावून घेऊ जेव्हा मी या जगातून जाईन." कदाचित हे ऋषि कपूर यांचे शेवटचे वाक्य असावेत जे आज नीतू सिंह यांनी व्यक्त केले.

ऋषि कपूर यांचे निधन 30 एप्रिल रोजी मुंबईच्या सर एच.एन.रिलायन्स हॉस्पिटलमध्ये झाले. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटूंबासह बॉलिवूडवर दु:खाचा डोंगर कोसळला.