Rishi Kapoor Funeral: काल अभिनेता इरफान खान यांच्या जाण्याच्या धक्का पचवत असतानाच, आज बॉलिवूडमधील अजून एक दिग्गज अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) गेल्याची बातमी आली. ऋषी कपूर मागच्या काही महिन्यांपासून कर्करोगाने ग्रस्त होते. आज सकाळी त्यांचे दक्षिण मुंबईच्या एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये निधन झाल्यावर, दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हे अंत्यसंस्कार इलेक्ट्रिक मशीनद्वारे करण्यात आले. निधनानंतर त्यांचे पार्थिव रुग्णालयातून मरीन लाइन्सच्या चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले आणि तिथे ते पंचतत्वात विलीन झाले. या दरम्यान अभिषेक बच्चन, चित्रपट दिग्दर्शक अयान मुखर्जी, सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्यासह इतर अनेकांनी रणबीर कपूर आणि नीतू सिंग यांना मानसिक आधार दिला.
मुंबई पोलिसांनी कपूर कुटुंबाला अंत्यसंस्कार करण्यासाठी संध्याकाळी 5 वाजेपर्यंतचीच वेळ दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्याआधी सर्व क्रिया पार पडल्या. हा अंत्यसंस्कार लॉक डाऊनच्या नियमांना धरूनच करण्यात आला.
करीना कपूर आणि सैफ अली खान
यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त होता
ऋषी कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूर साहनी दिल्ली येथे असल्याने तिला वडिलांचे शेवटचे दर्शन घेता आले नाही. परंतु दिल्ली पोलिसांनी तिला रस्ते मार्गाने मुंबईला जाण्याची परवानगी दिली आहे. अशा परिस्थितीत सुमारे 1400 किमी लांबीचा प्रवास करून ती मुंबईला येईल. (हेही वाचा: ऋषी कपूर यांनी जेव्हा ट्विट करत विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यासह टीम इंडियातील खेळाडूंची दाढीवरुन घेतली फिरकी)
Rishi Kapoor Dies: ऋषी कपूर यांना अक्षय,प्रियंका,रजनीकांत यांनी ट्वीटरवर अर्पण केली आदरांजली - Watch Video
दरम्यान, ऋषी कपूर यांचा जन्म 4 सप्टेंबर 1952 रोजी राज कपूर यांच्या पोटी झाला. 1970 मधील ‘मेरा नाम जोकर’मध्ये त्यांनी एक छोटीशि भूमिका साकारली होती. त्यानंतर ‘बॉबी’ आणि ‘यादोंकी बारात’ या चित्रपटांनी त्यांना लोकप्रियता मिळाली. सिनेइंडस्ट्रीमध्ये गेली 40 वर्षांत त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका साकारल्या.