बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Bollywood Actress Sushmita Sen) 10 वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा पदार्पण करणार आहे. माझ्या चाहत्यांसाठी मी बॉलिवूडमध्ये परतण्याचा निर्णय घेतला आहे, असं सुष्मिताने सांगितलं आहे. सुष्मिताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून याबद्दल माहिती दिली आहे. मिस युनिव्हर्सचा किताब जिंकलेल्या सुष्मिताने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. तसेच सुष्मिताने तरुण वयात 2 मुलींना दत्तकही घेतलं. या मुलींच्या संगोपनासाठी तिने बॉलिवूडमधून विश्रांती घेतली होती. परंतु, आता तब्बल 10 वर्षांनंतर सुष्मिता बॉलिवूडमध्ये परतणार आहे. (हेही वाचा - मराठमोळी अभिनेत्री मिताली मयेकर हिचे बोल्ड फोटोशूट्स पाहून भल्या भल्यांना फुटेल घाम; Watch Hot Photos)
दरम्यान, सुष्मिताने बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्याची घोषणा केल्यानंतर चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. सुष्मिताच्या चाहत्यांनी तिच्या या घोषणेमुळे आनंद व्यक्त केला आहे. सुष्मिताने बिवी नंबर 1, मै हूँ ना, आँखे, सिर्फ तुम, क्योंकी मैं झूठ नही बोलता आदी चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.
सुष्मिताने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये चाहत्यांच्या प्रोत्साहन आणि प्रेमामुळेच मी बॉलिवूडमध्ये परतत आहे, असं म्हटलंय. 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'नो प्रॉब्लेम' या चित्रपटामध्ये सुष्मिताने शेवटची भूमिका केली होती. सुष्मिताने 2000 साली एका मुलीला तसेच 2010 मध्ये दुसऱ्या मुलीला दत्तक घेतलं होतं. आपल्या दोन्ही मुलीला वेळ देण्यासाठी सुष्मिताने बॉलिवूडला ब्रेक दिला होता. सुष्मिताने बॉलिवूडमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला असला तरी, आता ती कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.