Katrina Kaif Visits Prayagraj (फोटो सौजन्य - PTI)

Katrina Kaif Visits Prayagraj: बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) ने आज सासू वीणा कौशल (Veena Kaushal) सह महाकुंभात (Mahakumbh 2025) पवित्र स्नान केलं. कतरिनाचे महाकुंभादरम्यानचे अनेक फोटोज आणि व्हिडिओज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 144 वर्षातून एकदाच आयोजित होणाऱ्या या दुर्मिळ महाकुंभात आतापर्यंत अनेक बॉलिवूड स्टार्सनाही हजेरी लावली. भारतीय आणि परदेशी स्टार्सनी देखील महाकुंभात पवित्र स्नान केलं. अक्षय कुमारनंतर कतरिना कैफ देखील महाकुंभात सहभागी झाली. येथे पोहोचल्यानंतर कतरिना कैफनेही माध्यमांशी संवाद साधला.

कतरिना कैफने शेअर केला महाकुंभाचा अनुभव -

कतरिना कैफने प्रयागराजमध्ये परमार्थ निकेतन आश्रमाचे अध्यक्ष स्वामी चिदानंद सरस्वती यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी अभिनेत्रीने महाकुंभात सहभागी होण्याचा आनंद आणि कृतज्ञता व्यक्त केली. यानंतर, ती तिच्या सासूसोबत संगममध्ये आंघोळ करताना आणि पूजा करताना दिसली. कतरिनाने आधी गुलाबी रंगाचा सूट घातला होता. मात्र, आंघोळीसाठी तिने पिवळ्या रंगाचे कपडे घातले होते. तसेच तिची सासू निळ्या सूटमध्ये दिसली. यावेळी कतरिनाने तिच्या सासूसोबत सर्व धार्मिक कार्यक्रमांमध्ये लक्षपूर्वक सहभागी घेतला. (हेही वाचा - Akshay Kumar at Maha Kumbh 2025: अभिनेता अक्षय कुमार महाकुंभमध्ये सहभागी, त्रिवेणी संगमावर केले पवित्र स्नान (Video))

पहा व्हिडिओ -

सासू-सूनामध्ये दिसले सुंदर बंध -

कतरिनाच्या महाकुंभाच्या भेटीदरम्यान अभिनेत्रीचा आणि तिच्या सासूमधील सुंदर बंध दिसून आला. त्यांचे बॉन्डींग पाहिल्यानंतर नेटीझन्स आता अभिनेत्रीचे कौतुक करत आहेत. लोक अभिनेत्रीला एक परिपूर्ण सून म्हणत आहेत. दोघीही महाकुंभाच्या आध्यात्मिक वातावरणात मग्न असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हे फोटो पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले की, 'कतरिनाने भारतीय संस्कृती पूर्णपणे स्वीकारली आहे.' दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिले, 'कॅटरीना तिच्या सासूची खूप काळजी घेते.' तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, 'प्रत्येकाला कतरिनासारखी सून असावी.'

दरम्यान, महाकुंभात स्नान करण्यापूर्वी एएनआयशी बोलताना कतरिनाने सांगितले की, मी खूप भाग्यवान आहे की मी यावेळी इथे येऊ शकले. मी खरोखर आनंदी आणि कृतज्ञ आहे. मी स्वामी चिदानंद सरस्वतींना भेटले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. मला प्रत्येक गोष्टीची ऊर्जा, सौंदर्य आणि महत्त्व आवडते. मी संपूर्ण दिवस इथे घालवण्यास उत्सुक आहे.