Akshay Kumar at Maha Kumbh 2025: अभिनेता अक्षय कुमार महाकुंभमध्ये सहभागी, त्रिवेणी संगमावर केले पवित्र स्नान (Video)

बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार प्रयागराजमधील महाकुंभमध्ये सहभागी झाला. त्रिवेणी संगममध्ये त्याने पवित्र स्नान केले. सफेद पोशाखात अक्षय कुमारने त्रिवेणी संगममध्ये त्याने पवित्र स्नान केले.

Akshay Kumar at Maha Kumbh 2025: अभिनेता अक्षय कुमार महाकुंभमध्ये सहभागी, त्रिवेणी संगमावर केले पवित्र स्नान (Video)
Photo Credit-X

Akshay Kumar at Maha Kumbh 2025: बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारने सोमवारी (24 फेब्रुवारी) प्रयागराजमधील महाकुंभाला (Akshay Kumar at Maha Kumbh) भेट दिली. सफेद पोशाख परिधान केलेला तो दिसला. त्यावेळी अनेक अंगरक्षक त्याच्यासोबत होते. महाकुंभमधील (Maha Kumbh 2025) अक्षय कुमारचा एक व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाला आहे. ज्यात तेथे उपस्थित असलेले अनेक जण त्याचे फोटो काढताना दिसत आहे. 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर, महाकुंभाच्या भव्य समारोपाच्या काही दिवस आधी अक्षय कुमारने महाकुंभमध्ये हजेरी लावली.(Maha Kumbh 2025: विजय देवरकोंडा महाकुंभमध्ये सहभगी; गळ्यात रुद्राक्षाची माळ घालून त्रिवेणी संगमावर केले स्नान (See Photo))

प्रयागराजमधील महाकुंभ 2025 मध्ये अक्षय कुमार

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 24, 2025 01:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).