Sushant Singh Rajput (Photo Credits: Twitter)

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) च्या आत्महत्येनंतर (Sucide) संपूर्ण चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. अद्याप सुशांतच्या आत्महत्येचं कारण समजू शकलेलं नाही. मात्र, सुशांतच्या आत्महत्येसंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, तपासात वेगवेगळ्या घटनांचा खुलासा होत आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या करण्यापूर्वी 3 दिवस सर्व कर्मचाऱ्यांचे पगार दिले होते. विशेष म्हणजे सुशांतने कर्मचाऱ्यांना पगार देताना 'यापुढे पैसे देणं शक्य होणार नाही,' असंही म्हटलं होतं.

दरम्यान, एका वेब सीरिजमधील भूमिकेसंदर्भात सुशांत दिशा सालियन सोबत चर्चा करत होता, अशी माहिती सुशांतच्या मॅनेजरने पोलिसांना दिली आहे. दिशा सालियन काही दिवसांपूर्वी सुशांतकडे मॅनेजर म्हणून काम पाहत होती. मात्र, सुशांतच्या आत्महत्येपूर्वीचं तिनेसुद्धा आत्महत्या केली होती. परंतु, सुशांत आणि दिशामधील चर्चेसंदर्भात कोणताही खुलासा पोलिसांच्या हाती लागलेला नाही. (हेही वाचा - Sushant Singh Rajput Death Inquiry: सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी चौकशीसाठी रिया चक्रवर्ती वांद्रे पोलीस स्थानकात दाखल)

मुंबई पोलिसांकडून सुशांतच्या आत्महत्येनंतर अनेकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. सुशांतच्या आत्महत्येची चौकशी करण्यासाठी 4 वेगवेगळ्या तपास यंत्रणा कामाला लागल्या आहेत. आज वांद्रे पोलीसांनी सुशांत सिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्तीचा जबाब नोंदवला आहे. यासाठी रिया चक्रवर्ती आज सकाळी 11 च्या सुमारास वांद्रे पोलिसात दाखल झाली. (हेही वाचा - Sushant Singh Rajput Death Inquiry: सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युच्या चौकशीच्या मागणीसाठी, जितेंद्र आव्हाड घेणार गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट)

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी बॉलिवूडमधील निर्माते-दिग्दर्शक करण जोहर, संजय लीला भन्साळी, अभिनेता सलमान खान आणि निर्माती एकता कपूर यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सुशांतला सात चित्रपटांमधून काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे त्याने डिप्प्रेशनमध्ये येऊन आत्महत्येचा पर्याय निवडला, अशी चर्चाही सध्या चित्रपटसृष्टीत रंगली आहे.