पूर्वी वयस्कर माणसांना टक्कल (Bald) पडण्याची समस्या होती. मात्र, आता ही समस्या अगदी किशोरवयीन मुलांपासून सुरू झाली आहे. रोजचे धकाधकीची जीवनशैली आणि खानपान यामुळे केस गळण्याची समस्या वाढू लागली आहे. महिलांमध्येदेखील ही समस्या तितकीचं पाहायला मिळते. अकाली टक्कल पडण्याच्या समस्येवर अनेक चित्रपटातून भाष्य करण्यात आल आहे. ‘बाला’, ‘उजडा चमन’ या चित्रपटांमधूनही कमी वयात टक्कल पडल्याने कोणकोणत्या समस्यांना सामोर जाव लागत, हे दाखवण्यात आल आहे.
बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर (Bollywood Actor Anupam Kher) यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून जगभरातील टक्कल्या (Bald) व्यक्तींना हे गाण समर्पित, असं म्हणत एक भावनिक गाण (Song) शेअर केल आहे. या गाण्यातून त्यांनी टक्कल पडल्याने किती त्रास होतो, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. (हेही वाचा - Sooryavanshi Trailer: अक्षय कुमार, अजय देवगन आणि रणवीर सिंह स्टारर अॅक्शन्स ने भरपूर असलेला 'सूर्यवंशी' सिनेमाचा ट्रेलर झाला प्रदर्शित; Watch Video)
दुनिया भर के गंजो को समर्पित मेरा ये भावपूर्ण गाना। My emotional song dedicated to all the Baldies in the world. 🤣😂🤓😎 #MondayMotivation pic.twitter.com/Ih2nXqfFV4
— Anupam Kher (@AnupamPKher) March 2, 2020
अनुपम खेर यांनी या गाण्याच्या माध्यमातून आपली व्यथा मांडली आहे. तसेच डोक्यावर केस नसणाऱ्या जगभरातील लोकांना त्यांनी हे गाण समर्पित केल आहे. 'ऐ मेरे बिछड़े बालों फिर से उग आओ', अशा या गाण्याच्या ओळी आहेत. या गाण्यात अनुपम खेर गळलेल्या केसांनो परत उगवा, असं म्हणत आहेत. खरं तर हे गाण ऐकूण कोणालाही हसू आवरण अशक्य आहे. अनुपम खेर यांनी शेअर केलेलं हे गाण सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेक युझर्संना या गाण्यावर आपल्या प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत.