Bobby Deol Share His Look in Kanguva: बॉबी देओलने वाढदिवशी चाहत्यांना दिलं खास गिफ्ट; 'कांगुवा'मधील खतरनाक लुक केला शेअर, See
Bobby Deol Share His Look in Kanguva (PC -Instagram)

Bobby Deol Share His Look in Kanguva: बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल (Bobby Deol) शनिवारी 27 जानेवारीला त्याचा 55 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी, त्याच्या आगामी 'कांगुवा' (Kanguva) चित्रपटाच्या निर्मात्यांनी अभिनेत्याचे फर्स्ट लूक पोस्टर शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. पोस्टरमध्ये बॉबी देओलचा क्रूर आणि खतरनाक लूक पाहायला मिळत आहे. बॉबी देओलचा 'कांगुवा' हा 2024 च्या मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी एक आहे. 'कांगुवा'मध्ये बॉबी देओल 'अॅनिमल' चित्रपटानंतर पुन्हा एकदा खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे.

बॉबी देओल साकारणार उधीरनचे पात्र -

'कांगुवा'मधला उधीरन कोण? हे रहस्य अखेर उलगडले आहे. बॉबी देओलच्या 55 ​​व्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी अखेर खुलासा केला आहे की, बॉबी देओलच 'शक्ती' उधेरनची भूमिका साकारणार आहे. त्याने या चित्रपटातील अभिनेत्याचे फर्स्ट लूक पोस्टर देखील शेअर केले आहे जे व्हायरल होत आहे. 'ॲनिमल' नंतर बॉबी देओल पुन्हा एकदा खलनायकाच्या भूमिकेत खळबळ माजवताना दिसणार आहे. (हेही वाचा - Animal Success Party: अ‍ॅनिमलच्या सक्सेस पार्टीमध्ये बॉबी देओल दिसला दमदार लूकमध्ये)

बॉबी देओलचा नवा खतरनाक लुक -

बॉबीने 'कांगुवा' मधून उधीरनच्या भूमिकेत त्याच्या खलनायकाचा फर्स्ट लुक शेअर केला आहे. पोस्टरच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, 'क्रूर, शक्तिशाली, अविस्मरणीय.' निर्मात्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बॉबी देओलचे पोस्टर देखील शेअर केले आहे. चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत असलेल्या बॉबी देओलचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. (हेही वाचा - Bobby Deol Sits On The Floor To Watch Animal: बॉबी देओलने थिएटरमध्ये जमिनीवर बसून पाहिला 'अॅनिमल' चित्रपट; चाहत्यांचे प्रेम पाहून भावूक झाला अभिनेता)

बॉबीचा हा आतापर्यंतचा सर्वात खतरनाक लूक आहे, जो पाहून कोणीही घाबरेल. पोस्टरमध्ये बॉबीला गर्दीने घेरले आहे. अंगावर रक्त दिसत असून केस विखुरलेले आहेत. तसेच गळ्यात हाडांचा हार घातलेला दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bobby Deol (@iambobbydeol)

चित्रपटात सूर्या बॉबी देओल आणि दिशा पटानी व्यतिरिक्त, जगपती बाबू, योगी बाबू, रेडिन किंग्सले, केएस रविकुमार आणि इतर अनेक कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. बॉबी देओल आणि दिशा पटानी 'कांगुवा'मधून तमिळ पदार्पण करत आहेत. हा चित्रपट एक काल्पनिक ॲक्शन ड्रामा आहे.