Mamta Kulkarni (PC - X/@Andec_Tanker)

Mamta Kulkarni Drug Case: अभिनेत्री ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni) ला ड्रग्जशी संबंधित एका प्रकरणात (Drug Case) मोठा दिलासा मिळाला आहे. संपूर्ण पुराव्याअभावी मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) नुकताच कुलकर्णी यांच्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द केला आहे. अभिनेत्री ममताने याचिका दाखल करून आपल्याला ड्रग्ज घोटाळ्यात अडकवले जात असल्याचे म्हटले होते. त्यांच्या याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने नवा निर्णय घेत कुलकर्णी यांच्यावर एफआयआरमध्ये केलेल्या आरोपांव्यतिरिक्त कोणताही पुरावा नसल्यामुळे ड्रग्ज प्रकरणातून त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

ममता कुलकर्णी यांच्याविरुद्ध सुरू असलेला 2000 कोटी रुपयांचा ड्रग्ज तस्करीचा खटला हायकोर्टाने रद्द केला आहे. या अभिनेत्रीवर तिचा पती विकी गोस्वामीसह ड्रग्स तस्करीचा आरोप होता. ममता यांच्याविरोधात पुरेसे पुरावे नाहीत, असे न्यायालयाने म्हटले आहे. या कारणास्तव हे प्रकरण बंद करण्यात आले आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशमुख यांच्या खंडपीठाने कुलकर्णी यांच्यावरील ड्रग्जचा खटला रद्द केला आहे. (हेही वाचा - Farah Khan's Mother Passes Away: कोरिओग्राफर फराह खान ला मातृशोक; Menaka Irani यांचं निधन)

ड्रग्ज प्रकरणी ममता कुलकर्णीची निर्दोष मुक्तता -

अभिनेत्री ममता कुलकर्णीने 50 हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्रीचा पती विकी गोस्वामी हा ड्रग लॉर्ड आहे जो नार्कोटिक ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स ऍक्ट, 1985 अंतर्गत नियंत्रित असलेल्या इफेड्रिनच्या निर्मिती आणि खरेदीमागील कथित सूत्रधार म्हणून गुंतलेला आहे. या प्रकरणी अभिनेत्रीच्या वकिलाने 2018 मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आपल्यावरील सर्व आरोप निराधार असून या प्रकरणात ती निर्दोष असल्याचे अभिनेत्रीने आपल्या याचिकेत म्हटले होते. अभिनेत्रीने आपल्यावरील खटला रद्द करण्याची मागणीही केली होती. (Money Laundering Case: ED मनी लाँड्रिंग प्रकरणात YouTuber एल्विश यादवची चौकशी होणार)

ममता कुलकर्णीने राज कुमार आणि नाना पाटेकर यांच्या 1992 मध्ये आलेल्या 'तिरंगा' चित्रपटातून पदार्पण केले. ममताने 1990 च्या दशकात 'करण अर्जुन', 'क्रांतीवीर', 'वक्त हमारा है', 'सबसे बडा खिलाडी' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. रुपेरी पडद्यापासून दूर असलेली ही अभिनेत्री 2016 च्या ड्रग स्मगलिंग प्रकरणातील आरोपींपैकी एक होती. ज्यामध्ये 2 हजार कोटी रुपयांचे इफेड्रिन जप्त करण्यात आले होते.