2020 मध्ये प्रदर्शित होणा-या बॉलिवूड मधल्या 'या' दिग्गज कलाकारांच्या चित्रपटांमध्ये होणार 'बिग फाईट', वाचा सविस्तर
Hindi Movies Releases in 2020 (Photo Credits: Instagram)

सध्या बॉलिवूडमध्ये दिवसागणिक नवनवीन चित्रपटांचे ट्रेलर पाहायला मिळत आहे. मात्र या चित्रपटांसाठी आपल्याला 2020 म्हणजेच नवीन वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. यात दीपिका पादुकोण, सलमान खान (Salman Khan), अजय देवगण (Ajay Devgan), अक्षय कुमार (Akshay Kumar) यांसारखे ब-याच दिग्गज कलाकारांचे चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या प्रत्येक कलाकारांचे चित्रपट तितकेच हटके आणि तितक्याच ताकदीचे असल्यामुळे या चित्रपटामध्येच तगडी स्पर्धा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यात छपाक, राधे, सूर्यवंशी यांसारख्या ब-याच चित्रपटांचा समावेश आहे.

यातील काही चित्रपटांचे ट्रेलर प्रदर्शित झाले असून काही चित्रपटांच्या नावांमुळेच ते चर्चेत आले आहे. पाहूयात कोणते आहेत हे चित्रपट:

1. दीपिका पदुकोणचा 'छपाक' आणि अजय देवगणचा 'तानाजी' यांच्यातही बॉक्सऑफिसवर तगडी स्पर्धा होणार आहे. दोघांचेही सिनेमा एकाच दिवशी म्हणजे 10 जानेवारीला प्रदर्शित होत असल्यानं बॉक्स ऑफिसवर कोण बाजी मारतं हे पाहणं रजक ठरणार आहे.

2. सध्या बॉलिवूडचं क्यूट कपल म्हणून ओळखले जाणारे रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्यात 2020 मध्ये बॉक्स ऑफिसवर चुरशीची स्पर्धा पाहायला मिळेल. राजामैलींच्या 'RRR'आलिया आणि वरुण धवनला कास्ट करण्यात आलं आहे. हा सिनेमा 30 जुलै 2020ला प्रदर्शित होणार आहे तर दुसरीकडे रणबीर कपूरचा 'शमशेरा' सुद्धा याच दिवशी प्रदर्शित होणार आहे.

हेदेखील वाचा- Chhapaak Official Trailer: दीपिका पादुकोण च्या दमदार अभिनयाचा 'छपाक' चा ट्रेलर आऊट; अॅसिड हल्ला पीडिता लक्ष्मी अग्रवालच्या जिद्दीची उलगडणार प्रेरणादायी कहाणी

3. सर्वात मोठी स्पर्धा अक्षय कुमार आणि सलमान खानमध्ये असणार आहे. सलमानचा 'राधे' आणि अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी' सिनेमा एकाच दिवशी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. सलमानचा 'राधे' 2020 मध्ये ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार असून अक्षयचा 'सूर्यवंशी' सुद्धा त्याच दिवशी प्रदर्शित होईल, अशी चर्चा बॉलिवूडमध्ये आहे.

सध्या VFX ची सुद्धा चलती असल्यामुळे वरील काही चित्रपटांमध्येही त्याची झलक पाहायला मिळणार आहे. मात्र यात काम करणारे कलाकार हे बॉलिवूडमधील अष्टपैलू कलाकार असल्यामुळे कोण कोणावर भारी पडेल हे 2020 मध्ये कळेलच.