Bharti Singh Drugs Case: ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून सातत्याने करण्यात येणाऱ्या तपासात काल टेलिव्हिजन वरील कॉमेडियन अभिनेत्री भारती सिंह (Bharti Singh) हिच्या घरी धाड टाकण्यात आली. या धाडीमध्ये भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachiyaa) यांच्या प्रोडक्शन हाऊस आणि घरातून मोठ्या प्रमाणात गांजा (Ganja) जप्त करण्यात आला. याच पार्श्वभुमीवर काल भारती हिला प्रथम अटक करण्यात आल्यानंतर हर्ष याला ही ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी कोर्टाने सुनावणी करत भारती आणि हर्षला येत्या 4 डिसेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.(Drugs Case: कॉमेडियन भारती सिंह हिला NCB कडून अटक, ड्रग्ज प्रकरणी छापेमारी केल्यानंतर केला मोठा खुलासा)
भारती आणि हर्ष यांनी आम्ही गांजाचे सेवन केल्याचे एनसीबी समोर कबुल केल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. आता या दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र भारती हिच्या चाहत्यांना या प्रकरणामुळे धक्का बसला असून त्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. तसेच सोशल मीडियात सुद्धा भारतीच्या नावाची चर्चा जोरदार सुरु झाली आहे.
Maharashtra: A court in Mumbai sends comedian Bharti Singh (in pic) and her husband Haarsh Limbachiyaa to 14-day judicial custody till 4th December, in connection with the seizure of ganja from their residence.
They were arrested by the Narcotics Control Bureau (NCB). https://t.co/Lq02uHxWHT
— ANI (@ANI) November 22, 2020
दरम्यान, ड्रग्ज प्रकरणी आतापर्यंत बहुतांश बॉलिवूड कलाकारांची चौकशी करण्यात आली आहे. यामध्ये दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान यांची नावे समोर आली आहेत. बॉलिवूड आणि ड्रग्ज प्रकरणी एनसीबी आता सातत्याने अधिक तपास करत असून यामध्ये काही नवी नावे सुद्धा समोर येत आहेत.