Bharat Slow Motion Challenge: सलमान खान याचे चाहत्यांसाठी 'स्लो मोशन चॅलेंज'; 5 विजेत्यांना मिळेल सलमानला भेटण्याची संधी
Salman Khan & Disha Patani (Photo Credits: Youtube)

सलमान खान (Salman Khan) याचा 'भारत' (Bharat) सिनेमा 5 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या सिनेमाचे स्टार्स प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. याच दरम्यान सलमान खान याने सिनेमासंबंधित एक इंटरेस्टींग चॅलेंज आपल्या चाहत्यांना दिले आहे. स्लो मोशन चॅलेंज (Slow Motion Challenge) असे या चॅलेंजचे नाव असून यासंबंधित एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओत तो म्हणतो की, "सर्वांना हॅलो. हे माझे म्हणजेच भारतचे स्लो मोशन चॅलेंज आहे आणि हे चॅलेंज सर्वांना करायचे आहे. या चॅलेंजमध्ये तुम्हाला जे काही करायचे आहे ते स्लो मोशनमध्ये करायचे आहे. हे चॅलेंज स्वीकारा आणि टिकटॉकवर व्हिडिओ अपलोड करा. तुमच्या व्हिडिओची मी आतुरतेने वाट पाहत आहे आणि तुमच्यापैकी मला आवडलेल्या पाच व्हिडिओ मेकर्संना मी मुंबईत जरुर भेटेन." भारत सिनेमाचं मोशन पोस्टर आऊट! 'सलमान खान' ने शेअर केला एका दशकातील 5 हट्के लुक्स मधील प्रवास (Watch Video)

व्हिडिओला कॅप्शन देताना सलमान खान याने लिहिले की, "स्लो मोशन चॅलेंज स्वीकारा आणि मला भेटण्याची संधी मिळवा." आतापर्यंत पाच हजार लोकांनी सलमान खानचा हा व्हिडिओ पाहिला आहे. हे चॅलेंज भारत सिनेमातील स्लो मोशन गाण्यावर अवलंबून आहे. या गाण्यावर दिशा पटानी आणि सलमान खान यांनी डान्स करताना दिसत आहेत.

पहा व्हिडिओ:

'भारत' सिनेमात सलमान खआन आणि कैतरिना कैफ, दिशा पटानी, सुनील ग्रोवर, तब्बू आणि जॅकी श्रॉफ यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर याने केले असून अतुल अग्निहोत्री, अलविरा अग्निहोत्री, भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.