Tejashri Pradhan And Sharman Joshi Kissing Scene (Photo Credits: Youtube)

झी मराठीवरील अग्गबाई सासूबाई या मालिकेतून शुभ्रा ही परफेक्ट सुनेची भूमिका साकारणाऱ्या तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) हिचा बॉलिवूड मधील पहिला वाहिला चित्रपट बबलू बॅचलर (Babloo Bachelor)  याचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी लाँच झाला आहे. ऐरवी सोज्वळ भूमिकेत दिसणारी तेजश्री अत्यंत बोल्ड अवतारात पाहायला मिळत आहे. इतकंच नव्हे तर तेजश्रीचा काही सेकेंदाचा लीप लॉक किसिंगचा (Lip Lock Kissing Scene) सीन सुद्धा या ट्रेलर मध्ये पाहायला मिळत आहे, सध्या या ट्रेलरवरून मराठी आणि हिंदी अशा दोन्ही सिनेरसिकांमध्ये जोरदार चर्चा आहेत, तर 20 मार्च रोजी चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांची प्रतिक्रिया काय असेल हे जाणून घेयण्यासाठी तेजश्री सुद्धा तितकीच उत्सुक आहे. तेजश्रीने आपली पहिल्याच सिनेमात शर्मन जोशी (Sharman Joshi) सोबत काम केले आहे.

'बबलू बॅचलर' या सिनेमातू तेजश्री बॉलिवूड पदार्पण करत असून अभिनेता शर्मन जोशीसोबत ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे. बबलू नामक एका तरुणाचे लग्न एका सुंदर मुलीशी होते मात्र मधुचंद्राच्या रात्रीच त्याची बायको पळून जाते आणि मग पुढे घडणारी कथा या सिनेमात मांडली जाणार आहे,काही दिवसांपूर्वी तेजश्रीने स्वतः आपल्या सोशल मीडियावरून या सिनेमाचे पोस्टर शेअर केले होते यात, नवरीचा लेहेंगा घातलेल्या दोन मुलींच्या मधोमध अडकलेला शर्मन जोशी पाहायला मिळत आहे, यावरून यात काहीतरी लव्ह ट्रँगलचा तडका आणि सस्पेन्स कॉमेडी पाहायला मिळेल असा अंदाज आहे.

पहा बबलू बॅचलरचा ट्रेलर

दरम्यान, तेजश्री आणि शर्मन यांच्या व्यतिरिक्त या सिनेमात पूजा चोप्रा, राजेश शर्मा आणि मनोज जोशी यांच्यांही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सिनेमाचं दिग्दर्शन अग्नीदेव चटर्जी यांनी केलं आहे. हा सिनेमा येत्या 20 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.