KL Rahul-Athiya Shetty Wedding Photos: अथिया-केएल राहुलचा लग्नसोहळा संपन्न; पहा नवविवाहित जोडप्याचे फोटोज
KL Rahul-Athiya Shetty Wedding Photos (PC - Instagram)

Athiya Shetty-KL Rahul Wedding: सुनील शेट्टी (Sunil Shetty) ची लाडकी अथिया शेट्टी (Athiya Shetty) च्या लग्नाचा सोहळा मोठ्या थाटामाटात सुरू आहे. मुंबईपासून दूर असलेल्या खंडाळा येथील फार्महाऊसवर अथियाचा लग्नसोहळा पार पडला. केएल राहुल आणि अथिया शेट्टीला हा लग्नसोहळा खाजगी ठेवायचा होता. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाव्यतिरिक्त फक्त त्यांचे जवळचे मित्र त्यांच्या लग्नाला उपस्थित होते. अथिया आणि केएल राहुल यांनी दुपारी 4 च्या सुमारास लग्नगाठ बांधली. त्यानंतर अभिनेत्रीचे वडील सुनील शेट्टी आणि तिचा भाऊ अहान शेट्टी यांनी मीडियाला भेटून लग्नाचा तपशील शेअर केला.

अथिया आणि केएल राहुलचे लग्न झाल्यानंतर सुनील शेट्टी मीडियाला भेटायला आला. सुनील शेट्टी आणि त्याचा मुलगा अहान शेट्टीचा हा व्हिडिओ सेलिब्रिटी फोटोग्राफर वरिंदर चावलाने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सुनील शेट्टी त्याच्या पारंपारिक धोती आणि कुर्त्यामध्ये तर मुलगा अहान पांढऱ्या रंगाच्या शेरवानीमध्ये दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सुनील शेट्टी हात जोडून सर्वांचे आभार मानताना दिसत आहे. (हेही वाचा - Athiya Shetty-KL Rahul Wedding: लेक अथियाच्या लग्नासाठी सजलं Suniel Shetty चं खंडाळ्याचं फार्म हाऊस (Watch Video, Pics))

 

View this post on Instagram

 

A post shared by @varindertchawla

केएल राहुल आणि मुलगी अथिया यांच्या लग्नाबद्दल अधिक माहिती देताना सुनील शेट्टी म्हणाले, 'सर्व फंक्शन्स अतिशय सुंदर पद्धतीने पार पडले. खूप कमी लोक होते आणि फक्त जवळचे कुटुंबीयच उपस्थित होते. पण कार्यक्रम खूप छान पार पडला. दोघांनीही दक्षिण भारतीय रितीरिवाजांनुसार लग्न केलं आहे. दोघांच्या फेरे झाले असून लग्नसोहळा संपन्न झाला आहे.'

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नानंतर, स्टार्स अभिनेत्याचे अभिनंदन करत आहेत. सुनील शेट्टीने मुलगी आणि जावई केएल राहुलच्या लग्नाची सर्व कार्ये पूर्ण झाल्यानंतर मीडियाला मिठाई वाटली. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. अथिया शेट्टीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून विवाहसोहळ्याचे खास फोटोज शेअर करण्यात आले आहेत.

अथिया आणि केएल राहुलच्या लग्नसोहळ्याचे खास फोटोज पहा -

 

View this post on Instagram

 

A post shared by Athiya Shetty (@athiyashetty)

अथियाच्या लग्नात बॉलिवूडचे अनेक स्टार्स आणि अभिनेत्रीचे जवळचे मित्र उपस्थित होते. नवविवाहित दाम्पत्याचे बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाद्वारे अभिनंदन केलं आहे. रिपोर्ट्सनुसार, अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांचे रिसेप्शन मुंबईत होणार आहे. ज्यामध्ये 3 हजार पाहुणे उपस्थित राहू शकतात.