आशुतोष गोवारीकर यांचा पानिपत नव्या वादाच्या भोवऱ्यात; पाहा का होत आहे #BoycottPanipat ट्रेंड
Ashitosh govarikar And Panipat (PC - File Image)

#BoycottPanipat Trends On Twitter: आशुतोष गोवारीकर यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘पानीपत’ या चित्रपटामधून चुकीचा इतिहास दाखवण्यात आला आहे असं म्हणत काल राजस्थानातील शेकडो लोकांनी निषेध नोंदविला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार या चित्रपटात महाराजा सूरजमल यांना चुकीचे दर्शविण्यात आले आहे. चित्रपटात त्यांना लोभी राजा म्हणून दाखवले आहे, जे ते कधी नव्हते. तसेच या सिनेमात, राजस्थानी आणि हरियाणवी भाषेचा वापर करण्यात आला आहे, परंतु, ते ब्रज भाषा (पाश्चात्य हिंदी भाषा) बोलत असत, असा दावा देखील करण्यात आला आहे.

या सर्व बाबी लक्षात घेत, देशातील अनेक बड्या लोकांनी त्यांची निराशा सोशल मीडिया हँडल्सद्वारे व्यक्त केली आहे. दरम्यान, ट्विटरवर राजस्थानमधील स्थानिक लोक या चित्रपटामधून दाखवण्यात आलेल्या चुकीच्या गोष्टींचा निषेध करत आहेत. हा निषेध इतका तीव्र होता की #BoycottPanipat हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत आहे.

परंतु काही नेटिझन्सनी, या चित्रपटाला निषेध दर्शवणे आणि नागरिकांनी त्यावर बहिष्कार घालण्यास सांगण्याशिवाय, या चित्रपटात बदल घडवून आणण्याची विनंती फिल्ममेकर्सकडे केली आहे.

काही नेटकऱ्यांनी नुसत्या चित्रपटातील चुकाच नाही तर फिल्ममेकर आशुतोष गोवारीकर यांना देखील ट्रोल केले आहे. तर काहींनी चित्रपटाला आपला प्रतिसाद दर्शवत #WhyBoycottPanipat असा हॅशटॅग वापरात ट्विट केले आहेत.

Raj Thackeray On Panipat: पाहा मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय लिहितात 'पानिपत' चित्रपटाबद्दल...

दरम्यान 'पानिपत' हा एक ऐतिहासिक चित्रपट असून त्यात मराठा आणि मुघल साम्राज्यात झालेल्या 'पानीपत'च्या तिसर्‍या लढाईचं कथानक दाखवण्यात आलं आहे. सिनेमात अर्जुन कपूर, कृती सॅनॉन, मोहनीश बहल, संजय दत्त, पद्मिनी कोल्हापुरे हे कलाकार प्रमुख भूमिका साकारताना दिसत आहेत.