गायिका आशा भोसले (Asha Bhonsle) यांच्या संगीतक्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व भारावून टाकणारे आहे. पण नुकतेच आशा भोसले यांनी त्यांच्यातील 'दिग्दर्शका'लादेखील पूर्ण संधी दिली आहे. नुकत्याच आशा भोसले 'पानिपत'(Panipat) सिनेमाच्या सेटवर पोहचल्या होत्या तेव्हा अविनाश गोवारीकर (Ashutosh Gowariker) यांच्यासोबत आशा भोसले यांनी अर्जुन कपूरचा (Arjun Kapoor) एक सीन दिग्दर्शित केला.
अविनाश गोवारीकर सध्या 'पानिपत' हा सिनेमा दिग्दर्शित करत आहे. या सिनेमाचं शूटिंग कर्जतमध्ये सुरू आहे. मोहनीश बहल, पद्मिनी कोल्हापुरे या सिनेमामध्ये नानासाहेब आणि गोपिकाबाई यांच्या भूमिकेत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, आशा भोसले पानिपतच्या सेटवर आल्या होत्या तेव्हा फार उत्साहात होत्या. त्यांनी आविनाश गोवारीकर यांच्यासोबत अर्जून कपूरचा एक सीनदेखील दिग्दर्शित केला. गोवारीकरांनी आशा भोसलेंच्या दिग्दर्शन कौशल्याचं कौतुक केलं. आशा भोसलेंची दिग्दर्शनावरील पकड चांगली असल्याचं म्हटलं आहे.
पानिपत हा सिनेमा 1761 सालच्या तिसर्या पानिपतच्या युद्धावर आधारित आहे. हा सिनेमा 6 डिसेंबर 2019 दिवशी रिलीज होणार आहे.