अर्जुन कपूर (Photo Credits-Instagram)

बॉलिवूड मधील अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्याने ट्वीट करुन दिली होती. त्यानंतर आता असे बोलले जात आहे की, कोरोना व्हायरसवर मात केल्यानंतर अर्जुन कपूर त्याचे प्लाझ्मा दान (Plasma Donate) करणार आहे. टाइम्स ऑफ इंडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन कपूर हा नेहमीच लोकांच्या मदतीला धावून येतो. याच कारणास्तव त्याने आता प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्जुन कपूर याच्या प्रकृती संबंधित अधिकाऱ्यांनी पोर्टलला असे सांगितले की, हे खरे आहे की अर्जुन कपूर प्लाझ्मा दान करणार आहे. तो 45 दिवसानंतर प्लझ्मा दान करणार आहे. त्याने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. अशा निर्णयामुळे अन्य जणांना सुद्धा स्फुर्ति मिळेल. कोरोना व्हायरसपासून जीव वाचवण्यासाठी प्लाझ्मा दान करणे फार महत्वाचे आहे. अन्य नागरिकांनी सुद्धा समोर येऊन प्लाझ्मा दान केले पाहिजे.

सुत्रांनी पुढे असे म्हटले की, अर्जुन कपूर प्लाझा दान करण्यासाठी सिटी रुग्णालयात जाणार आहे. पण कोणत्या तारखेला प्लाझ्मा दान करणार याबद्दल अद्याप स्पष्ट नाही आहे. हे खुप मदतशीर आहे. ज्यांनी कोरोनावर मात केलीय त्यांनी सुद्धा पुढे येऊन प्लाझ्मा दान करावे.(Malaika Arora recovers from coronavirus: आयसोलेशन मध्ये राहिल्यानंतर रुममधून बाहेर पडली मलाइका अरोडा, सोशल मीडियात पोस्ट करुन सांगितला अनुभव)

दरम्यान, अर्जुनला कोरोनाची लागण झाल्याचे समजताच त्याने सोशल मीडियात ही गोष्टी सर्वांना सांगितली होती. अर्जुनने पोस्ट मध्ये असे म्हटले होती की, माझे काम आहे तुम्हाला सांगणे की मी कोरोना पॉझिटिव्ह आलो आहे. मी ठिक आहे. स्वत:ला मी घरात क्वारंटाइन केले असून डॉक्टरांचा सल्ल्यानुसार उपचार घेत आहे. तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याचे आभार मानतो. मी तुम्हाला माझ्या प्रकृती संबंधित अपडेट्स देईन. या संकट काळात मला पूर्णपणे विश्वास आहे की मानव या व्हायरसवर नक्कीच मात करेल.