काजोल (Kajol) , रणबीर कपूर(Ranbir Kapoor) सोबत आता अभिनेत्री अनुष्का शर्माचाही (Anushaka Sharma) मेणाचा पुतळा मॅडम तुसाद (Madame Tussauds) म्युझियममध्ये उभारण्यात आला आहे. आज सिंगापूरच्या मॅडम तुसाद (Madame Tussauds Singapore ) म्युझियममधे अनुष्काच्या पुतळयाचं अनावरण करण्यात आले. अनुष्काप्रमाणे हुबेहूब आणि जीवंत पुतळा पाहून खुद्द अनुष्काही अवाक झाली आहे. पुतळ्यासोबतचा फोटो अनुष्काने(Anushaka Sharma) तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
अनुष्काचा खास पुतळा
अनुष्का शर्माच्या(Anushaka Sharma) पुतळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे तिच्या हातामध्ये एक सेल्फी घेत असलेला स्मार्टफोन आहे. त्यामुळे सिंगापूरच्या मॅडम तुसाद वॅक्स म्युझियममध्ये अनुष्का सोबत तिच्या चाहत्यांना फोटो काढण्याची संधी मिळणार आहे. अशाप्रकारचा पुतळा असलेली अनुष्का ही पहिली भारतीय सेलिब्रिटी आहे.
सिंगापूरच्या वॅक्स म्युझियममध्ये अनुष्का सोबत ओफरा विनफ्रे, क्रिस्टिआनो रोनाल्डो, लुइस हैमिल्टन यासारख्या आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींचे पुतळे सिंगापूरच्या वॅक्स म्युझियममध्ये आहेत.