Anushka Sharma ने पीके चित्रपटासाठी केली होती चेहऱ्यावर शस्त्रक्रिया; पहा दोन्ही फोटोंमधील फरक
Anushka Sharma (Photo Credits: Facebook)

एंटरटेनमेंट विश्वात अनेक कलाकार हे आपल्या लुकवर विविध प्रयोग करत असतात. बॉलीवूड इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार देखील या मेक ओव्हरसाठी आपल्या चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न करतात. शास्त्रक्रियांद्वारे आपला लुक बदलण्याच्या यादीत सर्वात टॉपवर असलेलं नाव म्हणजे अनुष्का शर्मा.

अनुष्काला पीके या सिनेमात थोडा वेगळा रोल करायचा होता. त्यासाठी तिने तिच्या चेहऱ्यावर काम करायचे ठरवले आणि शेवटी शस्त्रक्रिया करून तिने तिच्या चेहरा तसेच ओठांचा आकार बदलून घेतला होता. शस्त्रक्रिया केल्या नंतरचे अनुष्काचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाले आणि अनेकांनी त्यावर टीका देखील केल्या. अनुष्काची शस्त्रक्रिया किती फसली आहे हे सांगणारे मिम्सदेखील शेअर होत होते. त्याचबरोबर काहींनी तिला डोनाल्ड डक सारखी दिसत असल्याचे म्हटले आहे. पण काळासोबत अनुष्काने पुन्हा तिच्या चेहऱ्यावर मेहनत घेत तिचा लुक पूर्ववत केला. आणि बघता बघता प्रेक्षकांनीही तिच्या या लुकला स्वीकारले.

मला आधीपासूनच ठाऊक होतं Cancer आहे; Hrithik Roshan चे वडील Rakesh Roshan यांचा खुलासा

अनुष्काने आजवर बॉलीवूड सिनेसृष्टीला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अनुष्काच्या 'ऐ दिल है मुश्किल', रब ने बनादी जोडी', 'जाब ताक है जान' आणि बँड बाजा बारात' या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर भरगोस कमाई केली.