बॉलिवूड मधील दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्यासह मधू मनटेगा यांच्या घरी आज आयकर विभागाने धाड टाकली. तर मधू मनटेना यांची टँलेंट मॅनेजमेंट कंपनी Kwaan च्या ऑफिसात सुद्धा आयकर अधिकारी पोहचले. असे सांगितले जात आहे की, फँटम चित्रपटाच्या टॅक्स चुकवल्यासंबंधित ही छापेमारी करण्यात आली आहे. या प्रकरणी अनुराग, तापसी, विकास बहल यांच्यासह अन्य जणांचा सुद्धा समावेश आहे.(अभिनेत्री Taapsee Pannu आणि दिग्दर्शक Anurag Kashyap यांच्या घरावर आयकर विभागाचा छापे)
इंडिया टुडे ला मिळालेल्या माहितीनुसार मुंबई आणि पुणे येथे जवजवळ 20-22 ठिकाणी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपास केला जात आहे. ज्यामध्ये अनुराग, तापसी, मधु मनटेना, विकास बहल आणि अन्य यांच्या व्यतिरिक्त फँटम फिल्म्स आणि तीन संस्थांच्या कार्यालयांचा समावेश आहे. तर 2011 मध्ये अनुराग, मधु आणि विक्रमादित्य मोटवाने याच्यासह विकास बगल यांनी फँटम फिल्मसची स्थापना केली होती. पण 2018 मध्ये कंपनी बंद केली गेली.
या प्रकारावर आता काँग्रेस नेते आणि राज्य सरकारमधील कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण यांनी अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू वर आयकर विभागाने टाकलेली धाड ही मोदी सरकारच्या विरोधात बोलल्याने टाकली गेली असावी. तर शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट करत असे म्हटले आहे की, आम्हाला अपेक्षा आहे देशातील आयकर विभाग हे गुलामीच्या बंधनातून लवकरच मुक्त होईल. अशीच अपेक्षा ईडी आणि सीबीआयसाठी सुद्धा आहे.(Anurag Kashyap Accused of Sexual Assault: अनुराग कश्यपच्या पाठीशी उभी राहिली तापसी पन्नू, म्हणाली 'सर्वात मोठा Feminist तू आहेस')
दरम्यान, केंद्र सरकारवर अनुराग याने बहुतांश वेळा टीका केल्याचे दिसून आले आहे. तर तापसी पन्नूने नव्या कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना समर्थन दिले होते. या प्रकरणी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी असे म्हटले आहे की, प्रत्येक गोष्ट ही राजकीय दृष्टा जोडणे चुकीचे आहे. तपास यंत्रणा त्यांचे करत आहेत. तर हे प्रकरण कोर्टात सुद्धा जाऊ शकते.