Anurag Kashyap and Taapsee Pannu (Photo Credits: Instagram)

दिग्दर्शक, अभिनेता अनुराग कश्यप (Anurag Kashyap) याच्यावर एका तेलुगू अभिनेत्रीने लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर सोशल मिडियावर हे प्रकरण चांगलेच तापले. इतकेच नव्हे तर ट्विटरवर #ArrestAnuragKashyap हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला. यावर अनेकांच्या अनुराग कश्यप विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. मात्र यावर भाष्य करत अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) मात्र अनुराग कश्यप याच्या पाठीशी उभी राहिली आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन तिने आपला अनुरागसोबतचा फोटो शेअर करत त्याखाली 'माझ्या माहितीतील तू खरा स्त्री दाक्षिण्यवादी माणूस आहेस' असे म्हटले आहे.

तापसी अनुरागसोबत शूटिंगदरम्यानचा फोटो शेअर करत त्याखाली संदेश लिहिला आहे. 'तू सर्वात मोठा Feminist आहेस. लवकरच सेटवर भेटू, ज्या आर्टच्या जगात जिथे तू महिलांना शक्तिशाली आणि बलवान दाखवतोस' असे लिहिले आहे. Anurag Kashyap Accused Of Sexual Exploitation: अनुराग कश्यपने स्वत:वरील लैंगिक शोषणाच्या आरोपावर सोडलं मौन; म्हणाला 'थोडी तरी मर्यादा ठेवा मॅडम'

अनुराग कश्यप याने माझ्यासोबत जबरदस्ती करत खूप वाईट वागणूक दिली असल्याचे या तेलुगू अभिनेत्रीने म्हटले आहे. अभिनेत्रीने यासंदर्भात ट्विट केले असून तिने त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना टॅग केले आहे. तसंच मोदींकडे मदतीची याचना करत तिने लिहिले, "कृपया यावर कारवाई करा आणि देशाला या व्यक्तीचा खरा चेहरा दाखवा. मला माहित आहे, यामुळे माझे नुकसान होऊ शकते आणि माझी सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. कृपया माझी मदत करा."