Ankita Lokhande हिला मकर संक्रांतीच्या निमित्ताने Sushant Singh Rajput च्या 'या' लोकप्रिय गाण्याची झाली आठवण, Watch Video
Ankita Lokhande Flying Kite (Photo Credits: Instagram)

'पवित्र रिश्ता' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अर्चना म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) सध्या सोशल मिडियावर प्रचंड चर्चेत आहे. तिचा एक्स बॉयफ्रेंड दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्येनंतर तिने केलेल्या धक्कादायक खुलास्यामुळे ती प्रचंड चर्चेत आली होती. सोशल मिडियावरही ती बरीच सक्रिय असल्याने ती नेहमी नेटक-यांसाठी चर्चेचा विषय असते. ती पदोपदी आपण अजूनही सुशांतला विसरलो नाही हे तिच्या पोस्टमधून दाखवून दिले आहे. नुकताच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. मकर संक्रांती (Makar Sankranti) निमित्त अंकिता लोखंडे हातात पतंग घेऊन सुशांतच्या लोकप्रिय गाण्याच्या आठवणीत रमलेली दिसत आहे.

अंकिता लोखंडे सुशांतच्या 'काय पो छे' (Kai Po Che) या चित्रपटातील मांजा (Manja) या गाण्यावर पतंग उडविण्याचा आनंद घेताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

'हे गाणे आजही ऐकले तरी माझ्या अंगावर शहारा येतो. हा खूपच उत्कृष्ट चित्रपट होता. याचा प्रवासही खूप सुंदर होता' असे अंकिताने आपल्या पोस्टखाली म्हटले आहे.हेदेखील वाचा- Ankita Lokhande ने Instagram वर पूर्ण केले 30 लाख फॉलोअर्स; ट्रोलर्संनी सुशांत सिंह राजपूत ला दिलं क्रेडिट

या गाण्याच्या निमित्ताने अंकिताच्या मनात सुशांतच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या. 'काय पो छे' हा सुशांत सिंह राजपूतचा पहिला बॉलिवूड चित्रपट होता. या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण करत एक उंच झेप घेतली. ज्याची भरारी एम एस धोनीसारख्या सुपरहिट चित्रपटापर्यंत जाऊन पोहोचली.

काय पो छे या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर, हा चित्रपट फेब्रुवारी 2013 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सुशांत सिंह राजपूत सह राजकुमार राव, अमित साद, अमृता पुरी, असिफ बसरा हे प्रमुख भूमिकेत होते.