Animal OTT Release: रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' चित्रपट ओटीटीवर रिलीजसाठी सज्ज; 'या' दिवशी पाहता येणार
Animal Teaser (PC - Instagram)

Animal OTT Release: रणबीर कपूर (Ranbir Kapoor) चा अॅनिमल (Animal) हा चित्रपट रिलीज झाल्यापासूनच वादात सापडला आहे. आता अॅनिमलच्या ओटीटी रिलीज (Animal OTT Release) चे सर्व बंद दरवाजे उघडले आहेत. 25 जानेवारीला अॅनिमलच्या निर्मात्यांनी रणबीर कपूरच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. कारण, आता सिनेमाच्या ओटीटी रिलीजची पुष्टी करण्यात आली आहे. अॅनिमल चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोडले. रिलीज झाल्यानंतर काही दिवसांतच या चित्रपटाने 300 कोटींची कमाई केली, चित्रपटगृहांमध्ये चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांसह अनेक लोक चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची वाट पाहत होते.

या दिवशी होणार OTT वर रिलीज -

थिएटरमध्ये रिलीज होण्यापूर्वी सेन्सॉर बोर्डाने अॅनिमल चित्रपटाचे अनेक सीन्स कापले होते. प्रेक्षक संपूर्ण चित्रपट OTT वर पाहण्याची वाट पाहत होते. OTT प्लॅटफॉर्म Netflix ने अॅनिमलचे स्ट्रीमिंग अधिकार विकत घेतले आहेत. गुरुवारी, प्लॅटफॉर्मने चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबद्दल माहिती दिली. 26 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त नेटफ्लिक्सवर अॅनिमल रिलीज होईल. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. (हेही वाचा - Fighter Movie Advance booking: हृतिक-दीपिकाच्या 'फायटर'ची अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून मोठी कमाई)

अॅनिमलचे ओटीटी रिलीज चाहत्यांना निराश करणार आहे. कारण, दिल्ली उच्च न्यायालयाने चित्रपटाच्या सेन्सॉर बोर्डाने कापलेली दृश्ये OTT वर स्ट्रीम केली जाणार नाहीत. 'अॅनिमल'मध्ये रश्मिका मंदान्नाने रणबीर कपूरसोबत मुख्य भूमिका साकारली आहे. याशिवाय चित्रपटात अनिल कपूर, बॉबी देओल, तृप्ती डिमरी, सौरभ सचदेव, प्रेम चोप्रा आणि सुरेश ओबेरॉय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. अॅनिमलचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केले आहे.