Manjot Singh Saved Girl From Committing Suicide: सुपर हिरो!! ‘अ‍ॅनिमल’ फेम अभिनेता मनजोत सिंगने वाचवलेला आत्महत्या करणाऱ्या तरुणीचा जीव, (Watch Video)
Manjot Singh Saved a Girl From Committing Suicide (PC - Instagram)

Manjot Singh Saved Girl From Committing Suicide: अभिनेता मनजोत सिंग (Manjot Singh) अलीकडेच संदीप रेड्डी वंगा (Sandeep Reddy Vanga) दिग्दर्शित अ‍ॅनिमल (Animal) या चित्रपटातून प्रसिद्धी झोतात आहे. या चित्रपटात त्याने रणबीर कपूर (Ranbir Kapoor) च्या चुलत भावाची भूमिका केली होती. चित्रपटात त्याने एक धाडसी व्यक्तिरेखा साकारली होती. परंतु, केवळ चित्रपटातच नाही तर खऱ्या आयुष्यातही मनजोतने आपली धाडसी वृत्ती सिद्ध केली आहे. 2019 मधील एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक तरुणी आत्महत्येचा (Suicide) प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, मनजोत सिंग या तरुणीचा जीव वाचवताना व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडिओ त्यावेळचा आहे, जेव्हा मनजोत ग्रेटर नोएडा येथील शारदा विद्यापीठात बीटेकचे शिक्षण घेत होता.

व्हिडिओमध्ये, तरुणी कॉलेजच्या जवळपास दोन मजल्यावरील टेरेसवरून उडी मारण्याचा प्रयत्न करते. परंतु, मनजोतने यावेळी मुलीचा हात पकडला. त्यानंतर आणखी दोन जण मुलीला वाचवण्यासाठी धावून येतात आणि तिला खाली पडण्यापासून वाचवतात. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यात आली होती. (हेही वाचा - Animal Box Office Collection Day 18: रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांच्या अ‍ॅनिमल चित्रपटाने भारतात 519.64 कोटी रुपयांची केली कमाई)

मनजोत सिंगने या घटनेबाबत हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना सांगितले की, 'कोणीही तिच्या जवळ आल्यास मुलगी उडी मारण्याची धमकी देत होती. मी तिला काही त्रास आहे का? किंवा मतभेद आहेत का? असं विचारले. तिने तिच्या आईशी झालेल्या मतभेदाचा उल्लेख केला. मी सावधपणे तिच्या जवळ गेलो. मात्र, मी जवळ येताच तिने उडी मारली.'

पहा व्हिडिओ - 

 

View this post on Instagram

 

A post shared by Glamour Alert (@glamouralertofficial)

तथापी, या घटनेनंतर दिल्लीच्या शीख समुदायाने मनजोतचा सन्मान केला. तसेच नागरी सेवा परीक्षेसाठी त्याची कोचिंग फी भरण्याचे आश्वासन दिले. संदीप वंगा दिग्दर्शित अॅनिमल चित्रपटात मनजोतने रणबीरच्या भावाची भूमिका केली. या चित्रपटात रणबीर व्यतिरिक्त, रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर, तृप्ती डिमरी आणि बॉबी देओल यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 800 कोटींची कमाई केली