Republic Day 2024: अमिताभ बच्चन यांचा अनोखा उपक्रम, दिव्यांग मुलांसोबत साजरा केला प्रजासत्ताक दिन, Watch Video
Amitabh Bachchan celebrated Republic Day (PC - Instagram)

Republic Day 2024: आज भारत आपला 75 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day 2024) साजरा करत आहे. प्रत्येकजण आपापल्या खास शैलीत हा खास दिवस साजरा करत आहे. या राष्ट्रीय सणाच्या निमित्ताने बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी एक अनोखा उपक्रम केला आहे. अमिताभ यांनी यंदा दिव्यांग मुलांसोबत (Divyang Childrens) प्रजासत्ताक दिन साजरा केला आहे. या कार्यक्रमाचा एक एक व्हिडिओ देखील त्यांनी आपल्या इन्स्टाग्रामवरून शेअर केला आहे. याशिवाय बिग बींनी सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ते मूकबधिर मुलांसोबत दिसत आहे. व्हिडिओमध्ये राष्ट्रगीत ऐकू येत आहे. सर्व मुले सांकेतिक भाषेत राष्ट्रगीत गात आहेत. त्याच्यासोबत बिग बी सांकेतिक भाषेत राष्ट्रगीत सादर करत आहेत. या व्हिडिओला त्यांनी कॅप्शन लिहिले आहे की, 'प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा, जय हिंद'. (हेही वाचा - Republic Day 2024: अभिनेता सुनील शेट्टी यांच्याकडून भारतीयांना प्रजासत्ताक दिनानिमित्त खास शुभेच्छा, पाहा फोटो)

पहा ह्रदयस्पर्शी व्हिडिओ -

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

युजर्सनी केले बिग बींचे कौतुक -

अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टवर यूजर्सकडून प्रतिक्रिया येत आहेत. या खास उपक्रमाबद्दल सगळेच बिग बींचे कौतुक करत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'आम्हाला तुमच्याबद्दल विशेष आदर आहे.' आणखी एका यूजरने लिहिले की, 'पुन्हा एकदा तुम्ही आमच्या हृदयाला स्पर्श केला. तुम्ही खरंच वेगळे आहात'.

याशिवाय काही यूजर्स अयोध्या रामलला प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल या पोस्टवर अमिताभ बच्चन यांचे आभार मानताना दिसत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'अमित जी, तुम्ही मोठे स्टार असून श्री रामजींना भेटण्यासाठी अयोध्येत आलात हे पाहून खूप छान वाटले.' 22 जानेवारीला अमिताभ बच्चन अभिषेक बच्चनसोबत अयोध्येला पोहोचले होते. येथे पंतप्रधानांनी बिग बींची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.