कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) 2020 वर्ष बहुतेक लोकांसाठी चांगले ठरले नव्हते. या वर्षी कोट्यवधी लोकांचे व्यवसाय बुडले, लाखो व्यवसाय तोट्यात गेले, लॉकडाऊनमुळे स्थलांतरित मजुरांना अनेक किलोमीटर पायी चालत जावे लागले, लोकांचा रोजगार गेला यासोबतच सर्वांनाच काही महिने आपल्या घरात राहावे लागले. आता नवीन वर्षाची सुरूवात होत आहे. हे नवीन वर्ष कोरोना विषाणू लससोबतच अनेक नवीन आशा घेऊन येत आहे. अशा परिस्थितीत आगामी वर्ष हे 2020 सारखे नसावे अशीच सर्वांची इच्छा आहे. या वर्षाकडे पाहता, अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी आधीच येणाऱ्या वर्षाला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी एक हटके उपाय अवलंबला आहे.
आजकाल 2021 वर्षाबद्दल सोशल मीडियावर एक मीम जोरदार व्हायरल होत आहे, जो बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनीही आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. यामध्ये 2021 असे लिहिले आहे व या वर्षाला कोणाची नजर लागू नये म्हणून त्याच्या खाली लिंबू-मिरची (Nimbu Mirchi) बांधली आहे. अमिताभ बच्चन यांनीही हा फोटो शेअर केला आहे व कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'कृपा कृपा कृपा'.
View this post on Instagram
इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर करताना अमिताभ बच्चन यांनी लिहले आहे, ‘दो हज़ार बीस के अंत पर, अब कुछ ही दिन तो बाक़ी है, नज़र ना लगे, इक्कीस वाली टंगड़ी पर भाईया, नीबु मिर्ची टांग दे!!!’. म्हणजेच 2020 संपायला काहीच दिवस शिल्लक आहेत, आता 2021 ला कोणाची नजर लागू नये म्हणून लिंबू-मिरची बांधा. अशाप्रकारे अमिताभ बच्चन 2021 हे वर्ष सर्वांनाच उत्तम जावे अशी प्रार्थना करत आहेत. (हेही वाचा: सई लोकुर, अक्षय वाघमारे सह 'हे' मराठी सेलिब्रिटी यंदा चढले बोहल्यावर, जाणून घ्या या नवविवाहित जोड्या कोणत्या?)
2020 मध्ये बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनाही कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा समावेश होता. मात्र लवकरच हे सर्व लोक ठीकही झाले होते. दरम्यान, वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’चे शुटींग करत आहेत. यासोबतच 'ब्रह्मास्त्र', 'चेहरे' आणि 'झुंड' सारख्या चित्रपटांमध्ये ते भूमिका सकारात आहेत. 'ब्रह्मास्त्र' हा बिग बजेट चित्रपट आहे, ज्यात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत.