अमिताभ बच्चन यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस; फोटो शेअर करत दिली माहिती
अमिताभ बच्चन (Photo Credits: Facebook)

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी कोविड19 लसीचा दुसरा डोस (Second Dose of Covid-19 Vaccine) घेतला आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांनी याबद्दल माहिती दिली आहे. तसंच एक जोक देखील शेअर केला आहे, एप्रिल महिन्यात बिग बींनी (Big B) कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता.त्यानंतर काल त्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला. (FIAF Award 2021: महानायक अमिताभ बच्चन ठरले 'एफआयएएफ पुरस्कार' मिळवणारे पहिले भारतीय; सोशल मीडियावर व्यक्त केला आनंद)

बिग बींनी इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, "दुसराही झाला. कोविडवाला.. क्रिकेटवाला नाही... सॉरी सॉरी खूपच वाईट होता." असं मजेशीर कॅप्शन देत इमोजी देखील अॅड केले आहेत. अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर भलतेच अॅक्टीव्ह असून आपल्या पोस्टच्या माध्यमातून ते चाहत्यांशी कनेक्टेड राहतात.

पहा फोटो:

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतरही अमिताभ यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली होती. तसंच त्यांनी कोविड संकटात अनेक प्रकारे मदत करत सामाजिक भान जपले आहे. दरम्यान, मागील वर्षी अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली होती. (हे ही वाचा: KBC 13 Registration 2021: आजपासून KBC चे रजिस्ट्रेशन होणार सुरु, अमिताभ बच्चन यांच्या शो मध्ये सहभागी होण्यासाठी 'या' पद्धतीने करा नोंदणी)

सध्या देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोना बाधितांची वाढती संख्या आणि मृतांचा आकडा यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यातून सुरक्षित राहण्याचा एकमेव उपाय म्हणजे लसीकरण. त्यामुळे अनेक सेलिब्रिटी लस घेतानाचे फोटोज, व्हिडिओज शेअर करत नागरिकांना लस घेण्याचे आवाहन करत आहेत.