बिग बी Amitabh Bachchan आपल्या प्रत्येक ट्विटसह का लिहितात नंबर? शाहरुख खान समोर केला खुलासा
Amitabh Bachchan (Photo Credits: Instagram)

कोरोना व्हायरस (Coronavirus) विरोधात एक मोठी लढाई जिंकून आल्यानंतर बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी आपल्या कौन बनेगा करोडपती च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. याची माहिती त्यांनी आपल्या सोशल अकाउंटवर दिली आहे. तसे बिग बी (Big B) सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी छान संवाद साधत असतात. अशा वेळी अनेकदा ट्विटरवर ट्विटदरम्यान सर्वांनी एक गोष्ट पाहिली असेल की ते प्रत्येक ट्विटमध्ये ठराविक नंबर्स टाकतात. हे नंबर तुम्ही का टाकतात असा प्रश्न शाहरुख खान (Shahrukh Khan)  ने विचारल्यावर त्यांनी याबाबत शाहरुखसमोर खुलासा केला आहे.

खरे पाहता 'बदला' चित्रपटाच्या प्रमोशननंतर बिग बींनी शाहरुख खान ला या क्रमांक टाकण्यामागचे खरे कारण सांगितले. ते म्हणाले, 'जर मला मी कोणत्या दिवशी ट्विटवर काय बोललो हे ट्रॅक करायचे असेल तर या नंबर्सनी ते शोधणे सहज शक्य होते. हे नंबर्स माझे रेफरन्स पॉइंट्स आहेत.'

हेदेखील वाचा- Amitabh Bachchan To Be Alexa's Voice: अमिताभ बच्चन यांच्या आवाजात आता तुमच्याशी बोलणार एलेक्सा, 'हे' असेल या डिवाईसचे नाव

पाहूयात हे ट्विट:

बिग बीं कडून आपल्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळाल्यानंतर शाहरुखने त्यांचे आभार मानले होते. तसे बिग बी ही बॉलिवूडमधील खूपच मोठी व्यक्ती असून तमाम चाहत्यांपासून ते प्रत्येक बॉलिवूडकरांना त्यांचा अभिमान आहे. त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. अनेक जण तर त्यांना आपला आदर्श मानतात. त्यामुळे त्यांनी केलेल्या चांगल्या गोष्टी फॉलो देखील करतात. त्यामुळे शाहरुख प्रमाणे अनेकांना पडलेल्या या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाल्याने आता बिग बींची ही गोष्ट किती जण फॉलो करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

आपल्या अभिनयासह आपल्या दमदार आवाजाने त्यांनी न केवळ बॉलिवूडमध्ये तर हॉलिवूडमध्येही त्यांनी आपली छाप सोडली आहे. त्यांचा आवाज ही त्यांची खरी ओळख आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे या आवाजाची भुरळ अनेकांच्या घरात असलेल्या Alexa बाईंना देखील पडली आणि अखेरीस अॅमेझॉन (Amazon) कंपनीने अमिताभ बच्चन यांच्याशी भागीदारी केली. याचाच परिणाम आता तुम्हाला लवकरच तुमची लाडकी अॅलेक्सा अमिताभ बच्चन यांच्या आवाजात बोलणार आहे. भारतात अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या व्हॉईस असिस्टंट सर्विस Alexa मध्ये आता बिग बींचा आवाज ऐकायला मिळणार आहे.