Chehre Trailer: 'चेहरे' सिनेमाचा ट्रेलर आऊट; रिया चक्रवर्ती ची झलक पाहायला मिळाल्याने चर्चांना पूर्णविराम (Watch Video)
Chehre Trailer (Photo Credits: Youtube)

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि इमरान हाशमी (Emraan Hashmi) यांच्या 'चेहरे' (Chehre) सिनेमाचा ट्रेलर (Trailer) प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाच्या निमत्ताने बीग बी-इमरान हाशमी प्रथमच एकत्र झळकणार आहेत. त्यामुळे या सिनेमाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता आहे. पण त्याचबरोबर अजून एका कारणामुळे या सिनेमाची जोरदार चर्चा  आहे. ते म्हणजे सिनेमात रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) असणार की नाही? (Chehre Poster: अमिताभ बच्चन यांच्या चेहरे सिनेमाचे नवे पोस्टर रिलीज)

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आकस्मित निधनानंतर रिया चक्रवर्ती भोवती संशयाचे वलय निर्माण झाले. ड्रग्स प्रकरणात तिला तुरुंगातही जावे लागले. जेलमधून सुटका झाली असली तरी तिने सोशल मीडियापासून दूर राहणे पसंत केले आहे. तसंच चेहरे सिनेमाच्या पोस्टरवरही ती झळकली नव्हती. त्यामुळे या सिनेमातून तिला हटवण्यात आले की काय? अशी चर्चा गेले काही दिवस रंगली होती. दरम्यान, ट्रेलरमध्ये रिया चक्रवर्तीची झलक पाहायला मिळाल्याने सिनेमात रिया असण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. (येथे पहा टीझर)

चेहरे सिनेमाच्या ट्रेलरमध्ये अमिताभ बच्चन सोबत इमरान हाशमी, अनु कपूर आणि क्रिस्टल डिसूजा दिसत आहेत. तर रिया चक्रवर्तीची एक हलकीशी झलक पाहायला मिळत आहे. केवळ काही सेकंद रिया ट्रेलरमध्ये झळकते.

पहा ट्रेलर:

रूमी जाफरी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून आनंद पंडित निर्मितीची धुरा सांभाळत आहेत. हा सिनेमा 9 एप्रिल रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.