Chehre Teaser Released: अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी यांच्या 'चेहरे' चित्रपटाचा टीझर रिलीज; पहा व्हिडिओ
Chehre (Photo Credits: Instagram)

Chehre Teaser Released: बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि इमरान हाश्मी (Emraan Hashmi) त्यांच्या आगामी ‘चेहरे’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या दोघांच्या चेहरे चित्रपटाचा यावर्षीच्या बहुप्रतिक्षित चित्रपटांमध्ये समावेश आहे. पहिल्यांदाच या सिनेमात चाहत्यांना अमिताभ आणि इमरानची जोडी बघायला मिळणार आहे. चेहरे हा एक गूढ-थ्रिलर चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन रूमा जाफरी यांनी केले आहे. चित्रीकरणाद्वारे रिलीजच्या तारखेमध्येही मोठा बदल झाला आहे. त्याचबरोबर 'चेहरे' चा टीझरदेखील रिलीज करण्यात आला आहे. टीझर रिलीज होताच तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मीच्या चित्रपटाचा टीझर थोड्या वेळापूर्वी यूट्यूबवर रिलीज झाला आहे. 45 सेकंदाच्या या टीझरमध्ये चित्रपटाच्या कथेची झलक पाहायला मिळत आहे. या टीझरमध्ये बिग बी आणि इम्रानचा आवाज ऐकू येत आहे. टीझरमध्ये आपणास इमरानचा आवाज ऐकायला मिळत आहे. यात तो बोलत आहे की, "आज प्रामाणिक तोच आहे, ज्याची बेईमानी पकडली गेली नाही आणि बेईमान तोच आहे, ज्याचा गुन्हा पकडला गेला आहे." (वाचा - Har Funn Maula Song: आमिर खान आणि एली अवराम यांचे 'हर फन मौला' गाणे सोशल मिडियावर घालतय धुमाकूळ, 59 लाखांहून अधिक मिळाले व्ह्यूज)

दरम्यान, चित्रपटाची रिलीज डेट प्रथम 30 एप्रिल ठेवण्यात आली होती. मात्र, आता हा चित्रपट 30 एप्रिल ऐवजी 9 एप्रिलला थिएटरमध्ये रिलीज होईल. हा एक गूढ-थ्रिलर चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन रूमा जाफरी यांनी केले आहे. अलीकडेच अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मीच्या या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित झाले. बिग बीने आपल्या ट्विटर अकाउंटवर 'चेहरे' चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते.

अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी यांच्या व्यतिरिक्त या चित्रपटाच अन्नू कपूर, क्रिस्टल डिसूझा, धृतिमान चक्रवर्ती, रघुबीर यादव आणि सिद्धांत कपूर महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि सरस्वती एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडने केली आहे.