Har Funn Maula Song: आमिर खान आणि एली अवराम यांचे 'हर फन मौला' गाणे सोशल मिडियावर घालतय धुमाकूळ, 59 लाखांहून अधिक मिळाले व्ह्यूज
टी-सीरिज ने हे गाणे युट्यूबवर रिलीज केले होते. या गाण्यामध्ये एली खूपच हॉट दिसत आहे. तर आमिर खान सूटमध्ये खूपच स्टायलिश दिसत आहे.
परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) आणि एली अवराम (Elli AvrRam) यांचे गाणे 'हर फन मौला' (Har Funn Maula) कधी प्रदर्शित होणार याची चाहते आतुरतेने वाट पाहात होते. 'कोई जाने ना' (Koi Jaane na) या चित्रपटातील हे धमाकेदार गाणे आज अखेर प्रदर्शित झाली. या गाण्यामधील आमिर आणि एली अवराम यांचा अंदाज आणि ही जोडी प्रेक्षकांना प्रचंड भावली. या गाणे चाहत्यांना प्रचंड आवडले असून हे गाणे सोशल मिडियावर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. हे गाणे आज सकाळी प्रदर्शित झाले. मात्र दिवस संपायच्या आतच या गाण्या 59 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
टी-सीरिज ने हे गाणे युट्यूबवर रिलीज केले होते. या गाण्यामध्ये एली खूपच हॉट दिसत आहे. तर आमिर खान सूटमध्ये खूपच स्टायलिश दिसत आहे. हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही तासांत हे गाणे व्हायरल झाले.हेदेखील वाचा- Urmila Matondkar Comeback in Bollywood: तब्बल 12 वर्षानंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर करणार बॉलिवूडमध्ये कमबॅक
Watch Video
या गाण्यामध्ये आमिर आणि एली चा डान्स आणि सिग्नेचर स्टेपसुद्धा लोक पसंत करत आहे. काही महिन्यांपूर्वी आमिर खान आणि एलीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यात हे दोघे जण या गाण्याचे शूटिंग करताना दिसत होते.
'कोई जाने ना' या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर, यात कुणाल कपूर आणि अमायरा दस्तूर प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आमिर खानचे जवळचे मित्र अमीन हाजी आहेत. ज्यांनी त्याचा चित्रपट लगान आणि मंगल पांडे मध्येही काम केले होते. आमिर खान लवकरच करीना कपूरसह अद्वैत चंदन दिग्दर्शित 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटात दिसणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Mar 10, 2021 11:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

