बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना कोरोना व्हायरसची (Coronavirus) लागण झाली असून त्यांच्यावर मुंबईतील नानावटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. अमिताभ बच्चन यांच्यासह ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि आराध्या बच्चन (Aaradhya Bachchan) यांना देखील कोविड-19 ची बाधा झाली असून त्यांना देखील नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र ऐश्वर्या आणि आराध्या यांची कोरोना व्हायरसची चाचणी निगेटीव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यानंतर बिग बी अत्यंत भावूक झाले आणि त्यांनी आपल्या भावना सोशल मीडिया पोस्टद्वारे व्यक्त केल्या. (BMC ने अमिताभ बच्चन यांच्या निवासस्थान 'जलसा' बाहेरील पोस्टर हटवले)
ऐश्वर्या आणि आराध्या यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केल्याने बिग बी यांना अत्यंत आनंद झाला आणि त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. यावेळेस केलेल्या पोस्टमध्ये बिग बी यांनी लिहिले, "आपली लहान मुलगी आणि सून यांना हॉस्पिटलमधून सुटी मिळाली. मी झाले अश्रू रोखू शकलो नाही. ईश्वरा तुझी कृपा अपार आणि अपरंपार आहे."
अमिताभ बच्चन पोस्ट:
11 जुलै रोजी अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली. त्यानंतर त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान अमिताभ बच्चन कोरोनामुक्त झाल्याची बातमी देखील समोर आली होती. मात्र त्यानंतर लगेचच बिग बींनी हे वृत्त खोटं असल्याची माहिती ट्विटद्वारे दिली. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असतानाही बिग बी सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांशी संवाद साधत आहेत.