BMC ने अमिताभ बच्चन यांच्या निवासस्थान 'जलसा' बाहेरील पोस्टर हटवले
BMC removes poster which they had put outside Jalsa residence (PC- ANI)

मुंबई महानगरपालिकेने बॉलिवूड चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या निवासस्थान 'जलसा' (Jalsa) च्या बाहेर पोस्टर काढले आहे. मात्र, तेथील परिसर कंटेन्ट झोन (Containment Zone) म्हणून घोषित केला आहे. 11 जुलै रोजी अमिताभ बच्चन यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात (Nanavati Hospital) भरती करण्यात आलं होतं. अमिताभ यांनी स्वतः याबद्दल ट्विट करुन माहिती दिली होती.

अमिताभ यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याच्या काहीवेळातचं अभिषेक बच्चनेदेखील (Abhishek Bachchan) आपला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे या दोघांनाही नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. (हेही वाचा - Sushant Singh Rajput case: कंगना रौनौत हिला समन्स, महेश भट्ट, करण जौहर यांच्या मॅनेजर्सची होणार चौकशी- अनिल देशमुख)

दरम्यान, दुसऱ्या दिवशी ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी आराध्या यांनादेखील कोरोना विषाणूची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यामुळे ऐश्वर्याने स्वत:ला होम क्वारंटाईन केलं होतं. मात्र, काही दिवसांनंतर ऐश्वर्या आणि आराध्याला हलका ताप आल्याने त्यांनादेखील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

अमिताभ बच्चन यांच्या परिवारातील चार जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने चाहत्यांनी त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली होती. यानंतर अमिताभ यांनी आपल्या सर्व चाहत्यांचे आभार मानले होते. रुग्णालयात उपचार सुरू असतानादेखील अमिताभ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्यांच्या तब्बेतीचे अपडेट देत होते.