Big B यांना बॉलिवूडमध्ये 50 वर्षे पूर्ण, 'या' मार्गाने मिळाला होता पहिला चित्रपट
अमिताभ बच्चन (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)

'बिग बी' (Big B) म्हणून ओखळ असणाऱ्या अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना आज बॉलिवूड क्षेत्रात पदार्पण करुन 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. 15 फेब्रुवारी, 1969 रोजी अमिताभ यांनी त्यांचा पहिला चित्रपट 'सात हिंदूस्तानी' मधून त्यांना अभिनय करण्याची संधी मिळाली. त्यानतंर बिग बी यांनी यशाच्या शिखरावर पोहचण्यासाोठी कधीच मागे वळून पाहिले नाही. तेव्हा पासून ते आता पर्यंत आपल्या करिअरमधील चित्रपटात यशस्वीपणे आपली भूमिका बजावून लाखो-करोडो चाहत्यांची मने बिग बी यांनी जिंकली आहेत. तसेच यशाच्या पायऱ्या चढत असताना आयुष्यात अनेक संकटांना सामोरे जात आज इथंवर येऊन पोहचले आहेत.

अमिताभ बच्चन यांचा पहिला चित्रपट 'सात हिंदुस्तानी' बद्दल बोलायचे झाले तर दिग्दर्शक अहमद अब्बास सात कलाकारांचा शोध घेत होते. परंतु जेव्हा अमिताभ यांना या चित्रपटाबद्दल समजताच त्यांनी लगेचच मुंबईत धाव घेतली.तसेच त्यांनीच अनवर अली ही भुमिका साकारणार असल्याचे सांगितले. अनवर अली या भुमिकेतून आपले यशस्वीपद्धतीने कामाची छाप पाडणार असल्याचा निर्धार मनाशी केला होता. पहिला चित्रपट मिळण्यापूर्वीच मी नोकरी सोडली होती. परंतु चित्रपटात काम मिळाले पण मानधन हे समाधानकारक नसल्याचे अमिताभ बच्चन यांनी सांगितले.(हेही वाचा-Badla trailer OUT: 'बदला' घेण्यासाठी तापसी पन्नू तयार, अमिताभ बच्चन आपला विक्रम मोडणार का याबाबत उत्सुकता)

तर लवकरच एका नव्या कथेवर आधारित चित्रपट 'बदला' मधून अमिताभ बच्चन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये त्यांच्यासह तापसी पन्नू एका महत्वाच्या भुमिकेतून झळकणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सुजॉय घोष यांनी केले असून निर्मिती गौरी खान करणार आहे. येत्या 8 मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.