Badla Song Kyun Rabba: क्राईम थ्रिलर 'बदला' सिनेमातील 'क्यों रब्बा' सॅड सॉन्ग रसिकांच्या भेटीला!
Badla Movie (Photo Credits: Twitter)

Badla Song Kyun Rabba: अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि तापसी पन्नू (Taapsee Pannu) स्टारर 'बदला' (Badla) सिनेमातील पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. तुटलेल्या हृदयाची वेदना सांगणारे हे सॅड सॉन्ग अरमान मलिक याने गायले आहे. तर अमाल याने हे गाणे संगीतबद्ध केले असून गाण्याचे बोल कुमार याने लिहिले आहेत.

या गाण्याबद्दल तापसी पन्नूने सांगितले की, "हे गाणे सिनेमातील माझे सर्वात आवडते गाणे आहे. या गाण्यात सिनेमाची कथा अगदी सुंदररीत्या टिपण्यात आली आहे. हे गाणे प्रेक्षकांनाही तितकचे आवडेल, अशी आशा आहे." बदला सिनेमाचा ट्रेलर

तुम्हीही पहा हे गाणे:

शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट (Red Chillies Entertainment) या सिनेमाची निर्मिती करत आहे. तर या क्राईम थ्रिलरचे दिग्दर्शन सुजॉय घोष यांनी केले आहे. 8 मार्च रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.