Abhishek Bachchan Birthday: अभिषेक बच्चन याच्या वाढदिवसानिमित्त बिग बी यांनी दोन फोटोंमधून सांगितला बापलेकाच्या नात्याचा सुंदर प्रवास, See Pic
Abhishek Bachchan Birthday (Photo Credits: Instagram)

बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याचा आज 45 वा वाढदिवस... अभिषेक बच्चन ने 2000 मध्ये जे.पी.दत्ता दिग्दर्शित रेफ्यूजी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर हळूहळू त्याने बॉलिवूडमध्ये चांगलाच जम बसवला. युवा, बंटी और बबली, गुरु, सरकार, धूम यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट त्याने दिले. बिग बींचा मुलगा असल्यामुळे त्याला ज्युनियर बी असे ओळखू जाऊ लागले. त्याच्या वडिलांनी म्हणजेच अमिताभ बच्चन यांनी त्याच्या वाढदिवसानिमित्त सोशल मिडियावर एक सुंदर फोटो शेअर करुन बाप-लेकाच्या नात्यातील एका सुंदर प्रवासाची झलक दाखवली आहे.

अमिताभ बच्चन यांनी अभिषेकचा एक लहानपणीचा फोटो आहे ज्यात अमिताभ बच्चन यांनी अभिषेकचा हात पकडला आहे. तर दुस-या फोटोमध्ये मोठ्या झालेल्या अभिषेकने अमिताभ बच्चनचा हात पकडला आहे. या फोटोमधून बिग बींमधील आपल्या नात्यात झालेला एक मोठा बदल आपल्या चाहत्यांना दाखवला आहे.हेदेखील वाचा- अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि श्वेता बच्चन सह 'या' मराठी अभिनेत्रीला मिळाली जाहिरातीत झळकण्याची संधी, Watch Video

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

अभिषेकच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हा फोटो सोशल मिडियावर शेअर करुन अभिषेकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिषेक बच्चन याने आपल्या फिल्मी कारकिर्दीत अमिताभ बच्चन एवढे हिट चित्रपट देऊ शकला नाही. मात्र गुरु, युवा, सरकार, बंटी और बबली, धूम चित्रपटातील त्याच्या भूमिका आजही लोकांच्या लक्षात आहे. युवा चित्रपटात त्याने साकारलेल्या 'लल्लन' ने त्याला विशेष ओळख मिळवून दिली. या भूमिकेसाठी त्याला अनेक पुरस्कार देखील मिळाले.

अभिषेकने 20 एप्रिल 2007 रोजी अभिनेत्री ऐश्वर्या राय सह विवाह केला. त्यानंतर 16 नोव्हेंबर 2011 रोजी बच्चन कुटूंबियात एका गोंडस मुलीने जन्म घेतला. अभिषेक आणि ऐश्वर्याची मुलगी आराध्या. अभिषेकने चित्रपटांसह 'ल्युडो' या वेबसीरिजच्या माध्यमातून OTT मध्ये पदार्पण केले.