#MeToo या मोहिमेमुळे झगमत्या सिनेसृष्टीमागील अनेक कलाकारांची कृष्णकृत्यं समोर आली आहेत. हॉलिवूडपासून सुरू झालेली ही चळवळ आता बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रापर्यंत पोहचली आहे. अनेक बड्या पुरूष कलाकारांची यामध्ये नाव गुंतली आहे. आलिया भट्टची आई सोनी राजदान यांनीदेखील #MeToo मोहिमेमध्ये उडी घेतली आहे. सोनी राजदान यांच्यावर बलात्काराचा प्रयत्न झाल्याचा खळबळजनक खुलासा त्यांनी केला आहे.
10 वर्षांपूर्वीची गोष्ट आता इतक्या प्रमाणात कशी बाहेर पडत आहेत ? असं म्हणत काहींनी मी टू मोहिमेवर टीका केली आहे तर काहींनी याबाबत स्त्रीला तिच्यावरील अन्यायाला दाद मागण्याची संधी मिळाल्याचं सांगत कौतुक केलं आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सोनी राजदान यांनी एका चित्रीकरणाच्या सेटवर बलात्काराचा प्रयत्न झाला मात्र मी त्या प्रसंगापासून बचावल्याचं एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
या प्रकरणाची मी कुठेच वाच्यता केली नाही. त्या पुरूषाचं कुटुंब होतं,लहान मुलं होती. जर मी आवाज उठवला असता तर त्याच्या कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला असता असे म्हणत त्याच्या चूकीची शिक्षा इतरांना द्यायची नसल्याचंही सोनी राजदान यांनी सांगितलं आहे.
आलोक नाथदेखील #MeToo मोहिमेत अडकले आहेत. मद्यपान केल्यानंतर त्यांच्यामध्येही बदल होत असल्याचं सोनी राजदान म्हणाला. त्यांची वाईट नजर माझ्यावरही होती, मात्र त्यांना हवं ते मी कधीच मिळवून दिलं नाही. असे सोनी राजदान यांनी सांगितले आहे.
बॉलिवूडमध्ये नाना पाटेकर, आलोक नाथ, अन्नू मलिक, साजिद खान यांची नावंदेखील #MeToo च्या मोहिमेमधून समोर आली आहे.