
बॉलिवूड कपल आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) बरेच दिवस रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांच्या लग्नाबाबतही बर्याचदा बातम्या येत असतात. काही दिवसांपूर्वी अशी चर्चा होती की, या वर्षाच्या अखेरीस आलिया आणि रणबीरचे लग्न होणार आहे. मात्र सध्या तरी हे शक्य नसल्याचे दिसत आहे. असो या दोघांचे लग्न केव्हा होईल हे येणारा काळच सांगेल. पण यादरम्यान, आलियाने रणबीर कपूरच्या बिल्डींगमध्ये स्वत: साठी एक अपार्टमेंट खरेदी केल्याच्या बातम्या येत आहेत. आलियाचे हे नवीन अपार्टमेंट 2,460 चौरस फूट आहे. अशी बातमी आहे की, या बिल्डींगमध्ये रणबीर 7 व्या मजल्यावर राहत आहे, तर आलियाने 5 व्या मजल्यावर नवीन घर घेतले आहे.
आलियाचा जुहूमध्ये एक फ्लॅट आहे, ज्यामध्ये ती आपली बहीण शाहीनसोबत राहते. याशिवाय लंडनच्या कोव्हेंट गार्डनमध्येही आलियाचा फ्लॅट आहे. आता तिने बांद्राच्या पाली हिल येथे नवीन फ्लॅट घेतला आहे. आलियाने हे अपार्टमेंट 32 कोटींमध्ये खरेदी केले आहे. खास गोष्ट म्हणजे हे घर कपूर घराण्याच्या कृष्णा राज बंगल्याजवळ आहे.
अहवालात पुढे असेही सांगितले गेले आहे की, आलिया भट्टने या नवीन अपार्टमेंटच्या इंटीरियर डिझायनिंगची जबाबदारी शाहरुख खानची पत्नी गौरी खानवर सोपवली आहे. 2016 मध्ये गौरीने रणबीर कपूरच्या घराचे इंटिरियर डिझाइनही केले होते. घराच्या पूजेसाठी भट्ट परिवाराने काही जवळच्या मित्रांना लक्ष्मीपूजनादिवशी आमंत्रित केले होते. त्यात करण जोहर आणि अयान मुखर्जी यांचा समावेश होता. (हेही वाचा: येत्या 1 डिसेंबरला आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल अडकणार विवाहबंधनात, पंतप्रधान मोदी, अमिताभ बच्चन सह अनेक दिग्गजांना दिले आमंत्रण)
आलिया भट्ट सध्या जुहूमध्ये राहत असलेल्या घराची किंमत जवळपास 13 कोटी आहे. आलियाचे हे घर 2300 चौरस फुटांपर्यंत पसरलेले आहे. आलियाच्या या घराचे घराचे इंटिरियर डिझाइन रिचा बहलने केले आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये एका मुलाखती दरम्यान आलियाने आपल्या जुहू व लंडन येथील घरांबाबत माहिती दिली होती. आता तिने आपले तिसरे घर विकत घेतले आहे, जिथे ती लवकरच राहायला जाईल.