Brahmastra: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर, आलिया भट्‌टचा 'ब्रह्मास्त्र' चित्रपट 4 डिसेंबरला होणार प्रदर्शित; आलियाने शेअर केला अनाउंसमेंट व्हिडिओ
Brahmastra to release on 4 December 2020 (PC - Instagram)

दिग्दर्शक अयान मुखर्जीचा (Ayan Mukerji) ‘ब्रम्हास्त्र’ (Brahmastra) हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) मुख्य व्यक्तिरेखा साकारणार आहेत. आलियाने या चित्रपटाच्या अनाउंसमेंटचा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. तसेच दिग्दर्शक करण जोहरनेही (Karan Johar) आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर करत रिलीजची तारीख जाहीर केली आहे. या फोटोमध्ये अमिताभ बच्चन यांच्या घरी आलिया भट्‌ट, (Alia Bhatt) रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अयान मुखर्जी (Ayan Mukerji) बसलेले दिसत आहेत. त्यांच्या हातात एक पाटी आहे. या पाटीवर 4 डिसेंबर 2020 असे लिहिले आहे.

दरम्यान, आलियानेही आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रणबीर, अमिताभ आणि अयान 'ब्रह्मास्त्र' च्या रिलीज डेटबद्दल चर्चा करताना दिसत आहेत. (हेही वाचा -प्रियंकाच्या डिपनेक गाऊनवर आई मधू चोप्रा म्हणाली, 'तिचे शरीर आहे, तिला जे करायचे ते ती करेल')

'ब्रह्मास्त्र' चित्रपटात नागार्जुन अक्किनेनी, मौनी रॉय यांचीही भूमिका असणार आहे. हा चित्रपट हिंदीबरोबरच तमिळ, तेलगु, मल्याळम आणि कन्नड भाषेमध्ये रिलीज होणार आहे. बिग बींनीही यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी 'ब्रम्हास्त्र या वर्षी 4 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. आता अयान मुखर्जीला चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्याची परवानगी नाही.' चित्रपट ठरलेल्या दिवशी प्रदर्शीत करण्याचे आव्हान बिग बींनी अयान मुखर्जीला दिले आहे.