बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) याचा 'बेल बॉटम' (Bell Bottom) सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. सिनेमा अपेक्षित कमाई करत नसला तरी कोरोना संकटकाळात थिएटरमध्ये सिनेमा रिलीज होणे मोठी गोष्ट आहे. मागील आठवड्यात रिलीज झालेल्या सिनेमाने आतापर्यंत 20 कोटींच्या आसपास कमाई केली आहे. सिनेमाची क्रेझही प्रेक्षकांमध्ये अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच या सिनेमाची विशेष कामगिरी म्हणजे या सिनेमा जगातील सर्वात उंचावर असलेल्या थिएटरमध्ये रिलीज करण्यात आला आहे. याची माहिती खुद्द अक्षय कुमार याने आपल्या सोशल मीडियावर दिली आहे.
समुद्र सपाटीपासून 11562 फिट उंचीवर असलेल्या लेह मध्ये एक मोबाईल थिएटर आहे. तिथे बेल बॉटम सिनेमा रिलीज करण्यात आला आहे. समुद्र सपाटीपासून 11562 फुट उंचीवर असलेल्या लेह मध्ये एक मोबाईल थिएटर आहे. तिथे बेल बॉटम सिनेमा रिलीज करण्यात आला आहे. यासंदर्भात माहिती देताना अक्षयने ट्विटमध्ये लिहिले की, "माझे हृदय गर्वाने फुलले आहे. बेल बॉटम सिनेमा लडाख च्या लेहमधील सर्वात उंच मोबाईल थिएटरमध्ये रिलीज करण्यात आला आहे. जे 11562 फूट उंचीवर आहे. जे मायन्स 28 डिग्रीमध्येही काम करतं. किती आश्चर्यकारक गोष्ट आहे."
Akshay Kumar Tweet:
Makes my heart swell with pride that BellBottom was screened at World’s highest mobile theatre at Leh in Ladakh. At an altitude of 11562 ft, the theatre can operate at -28 degrees C. What an amazing feat! pic.twitter.com/5ozbpkTCIb
— Akshay Kumar (@akshaykumar) August 29, 2021
दरम्यान, कोरोना व्हायरस संकटामुळे मागील वर्षापासून सिनेमागृह बंद आहेत. त्यामुळे अनेक सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अक्षय कुमार हा पहिला स्टार आहे ज्याचा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला आहे. अद्याप सर्व थिएटर्स पूर्णपणे उघडलेले नाहीत. अशातच अक्षय कुमारने सिनेमागृहात सिनेमा प्रदर्शित करुन संपूर्ण थिएटर विश्वाला आलेली मरगळ दूर करत नवं चैतन्न फुलवलं आहे.