अक्षय कुमारचा 'बाल्ड' आणि योद्धाच्या रूपातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल
अक्षय कुमार (Photo Credits: Twitter)

सध्या अनेक कारणांमुळे 'हाऊसफुल्ल 4' हा सिनेमा चर्चेमध्ये आला आहे. या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणारा अभिनेता अक्षय कुमारचा लूकदेखील सोशल मीडियावर झपाट्याने शेअर होत आहे. सोशल मीडियावर अक्षय कुमारच्या फॅन क्लबद्वारा शेअर करण्यात आलेल्या एका पोस्टनुसार अक्षय कुमार बाल्ड लूक ( केस विरहित ) मध्ये दिसणार आहे. एका योद्धाच्या भूमिकेत अक्षय कुमार दिसत आहेत.

 

अक्षय कुमारचा व्हायरल होणारा लूक नेमका 'हाऊसफूल 4' सिनेमासाठी आहे की नाही ? याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सध्या #MeToo च्या वादामध्ये सिनेमाचा दिग्दर्शक साजिद खान अडकल्यामुळे अक्षय कुमारने या सिनेमाचं शूटिंग थांबवल्याचंही काही मीडिया रिपोर्ट्समधून समोर आलं होतं.

हाऊसफुल्ल 4 च्या टीमने नुकतच जैसलमेरमध्ये या चित्रपटाचं एक शेड्युल पूर्ण केलं आहे. अभिनेत्री क्रिती सेननने याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.

अक्षय कुमार हाऊसफुल्ल 4 प्रमाणेच रजनीकांत सोबत 2.0 या बिगबजेट चित्रपटातूनही रसिकांसमोर येणार आहे. या सिनेमात अक्षय नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.