Close
Search

#MeToo : अक्षयने केली 'हाऊसफुल 4’ चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्याची मागणी; साजिद खानने सोडला चित्रपट

साजिदच्या ‘हाऊसफुल 4’ चित्रपटाचे चित्रीकरण तातडीने रद्द करण्यात यावे अशी मागणी अक्षयने ट्विट करून चित्रपटाच्या निर्मात्यांकडे केली आहे.

मनोरंजन Prashant Joshi|

साजिद खान आणि अक्षय कुमार (Photo Credits: Twitter)

भारतामध्ये पडलेली #MeTooची ठिणगी आता वणव्यासारखी पसरत आहे. दिवसेंदिवस या आगीत होरपळलेल्या तरुणींची संख्या वाढतच आहे. या मोहिमेमधून आत्तापर्यंत आपण ज्यांच्याकडे आदराने पाहत होतो अशा प्रतिष्ठित व्यक्तींची नावे समोर येत आहेत. नाना पाटेकर, कैलाश खेर, चेतन भगत, अलोक नाथ ही यातील काही उदाहरणे. यातूनच महिलांवर होणाऱ्या अत्याचारांची व्याप्ती लक्षात येते. नुकतेच या चळवळीमध्ये अजून एक लोकप्रिय नाव समोर येत आहे ते म्हणजे, दिग्दर्शक साजिद खान.

महिलांवर अत्याचार होत राहतील, पुरुषांची नावे समोर येत राहतील मात्र हे थांबणार कधी? यासाठी सर्वांनी एकत्र येऊन या अत्याचारांच्या विरोधात उभे राहणे गरजेचे आहे. यातीलच एक पाऊल म्हणून अभिनेता अक्षय कुमार याने, दिग्दर्शक साजिद खानवर झालेल्या गंभीर आरोपानंतर त्याच्यासोबत काम करण्यास नकार दिला आहे. साजिदच्या ‘हाऊसफुल 4’ चित्रपटाचे चित्रीकरण तातडीने रद्द करण्यात यावे अशी मागणी अक्षयने ट्विट करून चित्रपटाच्या निर्मात्यांकडे केली आहे. हाऊसफुल 4 या चित्रपटात काम करण्याऱ्या नाना पाटेकर यांच्यावरही एका अभिनेत्रीने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे.

मनोरंजन क्षेत्रात काम करण्याऱ्या महिला पत्रकाराने तसेच ‘हमशक्ल’ चित्रपटामधील एका सहाय्यक दिग्दर्शकीने साजिद खानवर लैंगिक आणि मानसिक अत्याचाराचे आरोप लावले आहेत. या पार्श्वभूमीवर अक्षय कुमारने हा निर्णय घेतला आहे.

अक्षयने केलेल्या ट्वीटमध्ये तो म्हणतो, ‘देशात परत आल्यानंतर काही अस्वस्थ करणाऱ्या बातम्या ऐकायला मिळाल्या. माझी हाऊसफुल 4 चित्रपटाच्या निर्मात्यांना विनंती आहे की, या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होईपर्यंत चित्रपटाचे चित्रीकरण थांबवावे. इथून पुढे ज्यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप आहेत त्यांच्यासोबत मी काम करणार नाही. या प्रकरणात ज्या पीडित महिला आहेत त्यांना न्याय मिळालाच पाहिजे’

यानंतर साजिदनं टि्वट केलं की, 'या प्रकरणाबद्दलची नैतिक जबाबदारी म्हणून, जोपर्यंत या आरोपांची संपूर्ण चौकशी होऊन सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत मी आपल्या दिग्दर्शिकीय पदावरून पायउतार होत आहे.'

A4%B7%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A5%87+%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80+%27%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2+4%E2%80%99+%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87+%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3+%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80+%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%80%3B+%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A6+%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A8%E0%A5%87+%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A4%BE+%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F&via=LatestLYMarathi" title="Tweet">

#MeToo : अक्षयने केली 'हाऊसफुल 4’ चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्याची मागणी; साजिद खानने सोडला चित्रपट

साजिदच्या ‘हाऊसफुल 4’ चित्रपटाचे चित्रीकरण तातडीने रद्द करण्यात यावे अशी मागणी अक्षयने ट्विट करून चित्रपटाच्या निर्मात्यांकडे केली आहे.

मनोरंजन Prashant Joshi|
#MeToo : अक्षयने केली 'हाऊसफुल 4’ चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्याची मागणी; साजिद खानने सोडला चित्रपट
साजिद खान आणि अक्षय कुमार (Photo Credits: Twitter)

भारतामध्ये पडलेली #MeTooची ठिणगी आता वणव्यासारखी पसरत आहे. दिवसेंदिवस या आगीत होरपळलेल्या तरुणींची संख्या वाढतच आहे. या मोहिमेमधून आत्तापर्यंत आपण ज्यांच्याकडे आदराने पाहत होतो अशा प्रतिष्ठित व्यक्तींची नावे समोर येत आहेत. नाना पाटेकर, कैलाश खेर, चेतन भगत, अलोक नाथ ही यातील काही उदाहरणे. यातूनच महिलांवर होणाऱ्या अत्याचारांची व्याप्ती लक्षात येते. नुकतेच या चळवळीमध्ये अजून एक लोकप्रिय नाव समोर येत आहे ते म्हणजे, दिग्दर्शक साजिद खान.

महिलांवर अत्याचार होत राहतील, पुरुषांची नावे समोर येत राहतील मात्र हे थांबणार कधी? यासाठी सर्वांनी एकत्र येऊन या अत्याचारांच्या विरोधात उभे राहणे गरजेचे आहे. यातीलच एक पाऊल म्हणून अभिनेता अक्षय कुमार याने, दिग्दर्शक साजिद खानवर झालेल्या गंभीर आरोपानंतर त्याच्यासोबत काम करण्यास नकार दिला आहे. साजिदच्या ‘हाऊसफुल 4’ चित्रपटाचे चित्रीकरण तातडीने रद्द करण्यात यावे अशी मागणी अक्षयने ट्विट करून चित्रपटाच्या निर्मात्यांकडे केली आहे. हाऊसफुल 4 या चित्रपटात काम करण्याऱ्या नाना पाटेकर यांच्यावरही एका अभिनेत्रीने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे.

मनोरंजन क्षेत्रात काम करण्याऱ्या महिला पत्रकाराने तसेच ‘हमशक्ल’ चित्रपटामधील एका सहाय्यक दिग्दर्शकीने साजिद खानवर लैंगिक आणि मानसिक अत्याचाराचे आरोप लावले आहेत. या पार्श्वभूमीवर अक्षय कुमारने हा निर्णय घेतला आहे.

अक्षयने केलेल्या ट्वीटमध्ये तो म्हणतो, ‘देशात परत आल्यानंतर काही अस्वस्थ करणाऱ्या बातम्या ऐकायला मिळाल्या. माझी हाऊसफुल 4 चित्रपटाच्या निर्मात्यांना विनंती आहे की, या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होईपर्यंत चित्रपटाचे चित्रीकरण थांबवावे. इथून पुढे ज्यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप आहेत त्यांच्यासोबत मी काम करणार नाही. या प्रकरणात ज्या पीडित महिला आहेत त्यांना न्याय मिळालाच पाहिजे’

यानंतर साजिदनं टि्वट केलं की, 'या प्रकरणाबद्दलची नैतिक जबाबदारी म्हणून, जोपर्यंत या आरोपांची संपूर्ण चौकशी होऊन सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत मी आपल्या दिग्दर्शिकीय पदावरून पायउतार होत आहे.'

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change