खिलाडी Akshay Kumar ने एका युट्यूबर विरोधात केला 500 कोटींचा मानहानीचा दावा, सुशांत सिंह राजपूत केस शी संबंधित आहे हे प्रकरण
Akshay kumar (Photo Credit - File Photo)

बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput Case) याचे प्रकरण संपूर्ण देशभरात चांगले गाजले. या प्रकरणाचा तपासादरम्यान बॉलिवूडमधील ड्रॅग्ज रॅकेटही समोर आले. तसेच या संदर्भात अनेक दिग्गज कलाकारांची नावे देखील समोर आली. त्यामुळे या प्रकरणाला संपूर्ण मिडियाने देखील चांगलेच उचलून धरले. यात प्रसारमाध्यमांपासून सोशल मिडियावर देखील रोज नवनवीन बातम्या कानावर येऊ लागल्या. यात अनेक अफवा देखील पसरल्या. यात सुशांतच्या प्रकरणात खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) विरोधात चुकीची माहिती पसरवणा-या एका युट्यूबर विरोधात कडक पावले उचलत अक्षयने त्याच्याविरुद्ध 500 कोटींचा दावा केला आहे.

या युट्यूबरचे (You Tuber) नाव राशिद सिद्दीकी (Rashid Siddiqui) असे आहे. याने आपल्या आपल्या युट्यूब व्हिडिओमध्ये असा दावा केला होता की, अक्षय कुमार ने रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty)  हिला कॅनडा (Canada) ला जाण्यास मदत केली होती. मिडडे ने दिलेल्या बातमीनुसार, युट्यूबर राशिदने सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अक्षय कुमार ने रियाची मदत होती. तिला देशातून बाहेर कॅनडाला पाठविण्यात अक्षयने मदत केली होती असे यात म्हटले आहे.हेदेखील वाचा- Bollywood Drugs Case: ड्रग्ज प्रकरणी अभिनेता अर्जुन रामपाल याची तब्बल 7 तास चौकशी; एनसीबीच्या कार्यालयातून बाहेर पडताच दिली 'अशी' प्रतिक्रिया

ही खूपच धक्कादायक माहिती असून एखाद्याची प्रतिमा मलीन करण्याचा हा प्रकार आहे असे सांगत अक्षय कुमार ने याप्रकरणी अक्षय कुमारने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यमंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी देखील बातचीत केली होती. ज्यानंतर अक्षयने या युट्यूबर विरोधात कडक पावले उचलली आहेत. या संपूर्ण प्रकरणात त्याने राशिदवर 500 कोटींचा मानहानीचा दावा केला आहे.

युट्यूबर राशिद सिद्दीकी FF न्यूज नावाचे युट्यूब चॅनल चालवतो. रिपोर्टनुसार, सुशांत सिंह राजपूतच्या बाबतीत बातम्या देऊन राशिदने युट्यूब चॅनलच्या माध्यमातून 15 लाखांची कमाई केली आहे. मात्र आता आपल्या या व्हिडिओ घेऊनच तो अडचणीत आला आहे.