Pushpa 2: 'पुष्पा 2' समोर अजय देवगणच्या 'सिंघम अगेन'ची माघार, रिलीज डेट पुढे ढकलणार
Singham (PC -Twitter/ @Ajaydevgn95)

रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) 'सिंघम अगेन'  (Singham Again) हा याआधीच जाहीर केल्याप्रमाणे 15 ऑगस्ट रोजी रिलीज होणार होता. मात्र, त्याच वेळी 'पुष्पा 2 : द रुल' हा चित्रपटही रिलीज होणार आहे. यामुळे आता रोहित शेट्टीचा 'सिंघम अगेन' या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली जाणार आहे. रोहित आणि अजय देवगण यांना चित्रपट रिलीज करण्याची घाई नाही. 'रोहित शेट्टी, अजय देवगण आणि टीम रात्रंदिवस या चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. 15 ऑगस्ट 2024 ही रिलीज डेट लक्षात घेऊन युद्धपातळीवर चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. मात्र, या चित्रपटाच्या शूटिंगला अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागत आहे.  (हेही वाचा - Bhool Bhulaiyaa 3: भूल भुलैया 3 चे शूटिंग येथे कोलकाता येथे सुरू, कार्तिक आर्यनने रूह बाबाच्या अवतारातील फोटो केला शेअर (चित्र पाहा))

'जिओ स्टुडिओने रोहित शेट्टी आणि अजय देवगण यांना 'सिंघम अगेन' हा चित्रपट दिवाळी 2024 मध्ये रिलीज करण्याची सूचना केली आहे. दोघेही या तारखेचा विचार करत आहेत. दिवाळीमधील रिलीज डेट लक्षात घेऊन आता VFX आणि बॅकग्राउंड स्कोअर आता पुन्हा तयार केले जात आहेत. अर्जुन कपूर या चित्रपटात खलनायकी भूमिका साकारणार आहे.

अजय देवगण व्यतिरिक्त या चित्रपटात रणवीर सिंग, अक्षय कुमार, करीना कपूर, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ आणि अर्जुन कपूर यांच्या भूमिका आहेत. अर्जुन कपूर या चित्रपटात खलनायकी भूमिका साकारणार आहे. तसेच दिवाळीमध्ये  कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 3'रिलीज होणार आहे. त्यामुळे आता 'सिंघम अगेन'ही त्याच दिवशी रिलीज झाला तर मोठ्या चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर स्पर्धा होईल.