कॅन्सर पीडित चाहत्याने तंबाखूयुक्त पदार्थांची जाहिरात न करण्याचं आवाहन केल्यानंतर अजय देवगण कडून खुलासा
Ajay Devgan (Photo Credits: Twitter)

मागील काही दिवसांपासून तंबाखूच्या जाहिरातींचा प्रचार केल्यावरून अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) चर्चेमध्ये आहे. मात्र आता त्या आरोपांवर उत्तर देताना 'मी तंबाखूचा प्रचार देत नाही. मी जाहिरात करतो तेउत्पादन वेलचीचे आहे. तसं माझ्या करारामध्ये आहे.' असं सांगत सार्‍या चर्चांना पूर्णविराम लावला आहे. तंबाखूची जाहिरात न करण्याचा अजय देवगण याला चाहत्याचा सल्ला

अजय देवगणने दिलेल्या माहितीनुसार, माझ्या करारानुसार मी प्रचार करलेली उत्पादनं वेलचीयुक्त आहेत. जर हीच कंपनी दुसर्‍या पदार्थांची विक्री करत असेल तर त्याबद्दल मला माहिती नाही. सिनेमातही धुम्रपान करणं टाळलेलं आहे पण कधी गरज भासल्यास कामाचा भाग म्हणून ते केलं जाईल. असं म्हणाला.

काही दिवसांपूर्वी अजय देवगणच्या एका कॅन्सरग्रस्त चाहत्याने त्याला तंबाखूचा प्रचार होईल अशा जाहिराती करु नका, अशी विनंती केली होती. अजय तंबाखू उत्पादनाच्या जाहिराती करतो त्यामुळे त्याच्या एका चाहत्याने चक्क तंबाखू सेवनाला सुरुवात केली होती आणि कालांतराने त्याला कॅन्सरचे निदान झालं. याच कर्करोगग्रस्त चाहत्यानं अजयला तंबाखूचा प्रचार होईल अशा जाहिराती न करण्याचं आवाहन केलं होतं. De De Pyaar De Song Chale Aana: 'दे दे प्यार दे' सिनेमातील अजय देवगन आणि रकुल प्रीत सिंग यांचा इमोशनल ट्रॅक 'चले आना' आऊट! (Video)

अजय देवगण लवकरच आपल्याला ‘दे दे प्यार दे’ (De de Pyar De) ह्या हिंदी चित्रपटात पाहायला मिळणार आहे.  या सिनेमात  अजयसह तब्बू आणि रकुलप्रीत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.