कोरोनामुक्त झालेल्या ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या यांनी खास शैलीत मानले चाहत्यांचे आभार (View Post)
Aishwarya Rai Bachchan Aradhya Bachchan Tested COVID 19 Positive (Photo Credits: Filmrfare)

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि तिची मुलगी आराध्या बच्चन (Aaradhya Bachchan) या दोघींनीही कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गावर यशस्वीरित्या मात केली आहे. मुंबईतील नानावटी रुग्णालयात (Nanavati Hospital) त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यानंतर दोघींचीही कोरोना विषाणूंची चाचणी निगेटीव्ह आल्याने सोमवारी त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. आता ऐश्वर्या राय बच्चन हिने आपल्या चाहत्यांना आणि शुभचिंतकांना खास शैलीत धन्यवाद दिले आहेत. कोरोना व्हायरस संसर्गातून पूर्णपणे बरे होण्यासाठी प्रार्थना करणाऱ्या चाहत्यांचे ऐश्वर्या हिने आभार मानले आहेत.

ऐश्वर्या हिने इंस्टाग्रामवर मुलगी आराध्या सह खास फोटो शेअर करत लिहिले, "माझ्यासाठी आणि माझी मुलगी आराध्यासाठी, पा (अमिताभ बच्चन) आणि अभिषेक साठी तुम्ही सर्वांनी केलेल्या प्रार्थनेबद्दल धन्यवाद. मी अत्यंत कृतज्ञ आहे आणि नेहमी याबद्दल ऋणी राहीन. परमेश्वराची कृपादृष्टी तुमच्या सर्वांनावर कायम राहू दे. तुम्ही सर्व सुरक्षित रहा. तुम्हा सर्वांना माझे प्रेम." (ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अमिताभ बच्चन यांना अश्रू अनावर; पहा बिग बी यांची भावूक पोस्ट)

पहा पोस्ट:

कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या ऐश्वर्या आणि आराध्या यांना सुरुवातीला होम क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र त्यानंतर हलका ताप जाणवू लागल्याने दोघींनाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तर अमिताभ, अभिषेक यांच्यावर सुरुवातीपासूनच हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. ऐश्वर्या आणि आराध्या यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केल्यानंतर आता अमिताभ आणि अभिषेक कोरोनामुक्त होण्याची प्रतिक्षा आहे.